वर्ध्यातील प्रतिपंढरीच्या वारीला पावणे दोनशे वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:58 PM2019-07-11T12:58:16+5:302019-07-11T12:59:05+5:30

वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परपंरा. ही परंपरा जोपासणारे गाव म्हणजे वर्धा जिल्ह्यातील घोराड. विदर्भाचे प्रतिपंढरपूर अशी या गावाची ओळख.

Two hundred-year tradition of Vari in Wardha district | वर्ध्यातील प्रतिपंढरीच्या वारीला पावणे दोनशे वर्षांची परंपरा

वर्ध्यातील प्रतिपंढरीच्या वारीला पावणे दोनशे वर्षांची परंपरा

Next
ठळक मुद्देतिसरी पिढी जोपासतेय धार्मिक वारसा

विजय माहुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परपंरा. ही परंपरा जोपासणारे गाव म्हणजे वर्धा जिल्ह्यातील घोराड. विदर्भाचे प्रतिपंढरपूर अशी या गावाची ओळख. या गावातून श्री.संत केजाजी महाराज यांनी वारीची परंपरा सुरू केली. या वारी परंपरेला पावणे दोनशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. या गावातील तिसरी व चौथी पिढीही महाराजांचा हा वारसा अजूनही चालवित आहे. त्याचा हा आढावा.
आषाढीची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या विठूरायाचे वेध लागतात. पाऊस असो की पेरणीचा हंगाम, सर्व कामे, अडचणी सोडून त्यांना केवळ पंढरपूर गाठायचे असते. यंदाही विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया घोराड नगरीतून संत केजाजी महाराज पायदळ दिंडी पंढरपूरच्या वाटेने असून हे दिडींचे १५ वे वर्ष आहे. मात्र, संत केजाजी महाराज पंढरपूरची पायदळ वारी करायचे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र संत नामदेव महाराज यांनीही प्रथा १९५८ सुरू ठेवली. त्यानंतर विठ्ठलभक्त हरिभाऊ रामटेके यांनी १९९२ पर्यंत पायदळ वारी केली. यांच्या पश्चात १५ ते २० वर्षांचा खंड पडला; मात्र या वारीच्या परंपरेला पावणे दोनशे वर्षांची घोराडमध्ये असलेली परंपरा आजही सुरू आहे.
यवतमाळ येथील नरेश महाराज पाटील यांनी २००४ मध्ये घोराडवरून संत केजाजी महाराज दिंडी काढण्यास पुढाकार घेतला; मात्र ही दिंडी आळंदी येथून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी आहे. या दिंडीत युवा, वयोवृद्ध महिला, पुरूष वारकऱ्यांचा समावेश आहे. पेशाने सेवानिवृत्त शिक्षक असलेले बबनराव माहुरे हे या दिडींचे विणेकरी आहेत. ते आज ८० वर्षे वयाचे आहे. २५ जूनला ही दिंडी आळंदीवरून पंढरपूरकरिता प्रस्थान झाली. दररोज २५ ते ३० कि़मी. अंतर हरिनामाचा जयघोष, टाळ मृदंगाचा निनाद, माऊली, तुकारामांचा जप करीत पायदळ वारी करीत असंख्य वारकरी दिवसाचा मुक्काम रात्री करीत असले तरी पहाटे ४ वाजतापासूनच दिंडीत पंढरीची आस करीत मार्गस्थ होते. या दिंडीत घोराड सह इतर गावातील वारकरी सहभागी असून जवळपास पाचशेहून अधिक वारकरी आहेत. दिंडीत सहभागी वारकऱ्यांच्या नाश्ता व भोजनाची व्यवस्था अन्नदात्यांकडून आहे. ही दिंडी ११ जुलै २०१९ ला पंढरपूर येथे पोहोचणार आहे. १४ पर्यंत मुक्काम असणार आहे.

घोराडवरून जातात हजारो वारकरी
या महिन्यात घोराडवरून्न कुणी ट्रॅव्हल्स, खासगी वाहन, व रेल्वेने हजारो वारकरी पंढरपूरला जाऊन विठूरायाचे दर्शन घेऊन येतात. यात वयोवृद्ध, युवक व बाल गोपालकांचा समावेश आहे. हा महिना जणू घोराडकरांना पंढरीचे वेध लावणाराच ठरतो.

दोन पायदळ दिंड्या
१५ वर्षांपासुन सुरू असलेली दिंडी आळंदीवरून प्रस्थान करते तर गत ४ वर्षांपासून घोराड येथील हरिभाऊ महाकाळकर यांच्या नेतृत्वात घोराड ते पंढरपूर पायदळ दिंडी सुरू असून पवनार, देवळी, यवतमाळ, माळेगाव, औंढा, परभणी, गंगाखेडमार्गे पंढरपूरला पोहोचणार आहे.


 

 

Web Title: Two hundred-year tradition of Vari in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.