वर्ध्यात पाणी पुरवठा व स्वच्छतेवरून नगरपरिषदेत हाणामारीच्या दोन घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:45 PM2019-10-15T12:45:19+5:302019-10-15T12:48:23+5:30
दीड वर्षांपासून प्रभागात पाणी पुरवठा होत नसल्याचे कारण पुढे करीत माजी नगराध्यक्षाचा मुलगा डॉ. सुनील चरणसिंग चावरे यांनी न.प.च्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता निलेश नंदनवार यांना तर परिसरात वेळीच घंटागाडी येत नसल्याचे कारण पुढे करीत भाजप नगरसेवक कैलास राखडे यांनी आरोग्य निरीक्षक नवीन गोंडाणे यांना मारहाण केल्याच्या दोन घटना मंगळवारी घडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: दीड वर्षांपासून प्रभागात पाणी पुरवठा होत नसल्याचे कारण पुढे करीत माजी नगराध्यक्षाचा मुलगा डॉ. सुनील चरणसिंग चावरे यांनी न.प.च्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता निलेश नंदनवार यांना तर परिसरात वेळीच घंटागाडी येत नसल्याचे कारण पुढे करीत भाजप नगरसेवक कैलास राखडे यांनी आरोग्य निरीक्षक नवीन गोंडाणे यांना मारहाण केल्याच्या दोन घटना मंगळवारी घडल्या. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ वर्धा नगर पालिकेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. शिवाय न.प. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून दोन्ही घटनांची तक्रार दाखल केली आहे. डॉ. सुनील चावरे यांचे वडील दिवंगत चरणसिंग चावरे यांनी यापूर्वी वर्धा न.प.ची नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तर सध्या डॉ. सुनील चावरे यांची आई भाजपची नगरसेविका आहेत. तर नवीन गोंडणे यांना मारहाण करणारे कैलास राखडे हेही भाजपचेच नगरसेवक आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही घटना घडल्याने न.प. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे