तीन वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार, सहा जखमी
By admin | Published: March 15, 2017 01:42 AM2017-03-15T01:42:26+5:302017-03-15T01:42:26+5:30
धुळवडीच्या दिवशी झालेल्या दोन अपघातांत दोघे ठार झाले तर तीघे गंभीर जखमी झाले.
वर्धा : धुळवडीच्या दिवशी झालेल्या दोन अपघातांत दोघे ठार झाले तर तीघे गंभीर जखमी झाले. मंगळवारी झालेल्या अपघातात तीघे गंभीर जखमी झाले. सावंगी (मेघे), खरांगणा व सेलू पोलीस ठाण्यांतर्गत हे अपघात घडले.
दुचाकी अपघातात मामा ठार, भाचा गंभीर
वर्धा : भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. यात मामा ठार झाला तर भाचा गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वर्धा-वायगाव मार्गावरील इंझापूर शिवारात घडला. विजय कामनापूरे, असे मृतकाचे तर अमित चंद्रकांत देशपांडे रा. गजानननगर वर्धा, असे जखमीचे नाव आहे.
प्रापत माहितीनुसार, गजानननगर येथील अमित देशपांडे व विजय कामनापूरे हे दोघे एमएच ४० टी ४०६० क्रमांकाच्या दुचाकीने वायगावकडून वर्धेकडे येत होते. दरम्यान, इंझापूर गावाजवळ दुचाकीला समोरून येणाऱ्या एमएच ३२ एए ६४३२ क्रमांकाच्या दुचाकीने जबर धडक दिली. यात विजय कामनापूरे यांचा जागीच मृत्यू झाला तर अमित देशपांडे गंभीर जखमी झाला. नागरिकांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच सावंगी (मेघे) पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह व अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला. याबाबतच्या तक्रारीवरून सावंगी (मेघे) पोलिसांनी आरोपी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
दुचाकी घसरल्याने एक ठार, दोघे जखमी
आकोली- धुळवडीच्या दिवशी पारधी बेड्यावर मद्यपान करून भरधाव गावाकडे परत जाताना दुचाकी अनियंत्रित होऊन घसरली. यात एक जण जागीच ठार झाला तर दोघे जखमी झाले. ही घटना आकोली-आंजी (मोठी) मार्गावर ५.१५ वाजता घडली. तिघेही पेठ या गावचे आहे.
गावात दारूबंदी असल्याने पेठ येथील विजय गोपाल हिवरे (५०), मंगेश अशोक भालेराव (३०) व राजेश रामभाऊ सरोदे (२९) हे दुचाकी क्र. एमपी २८ सी ०२१८ या दुचाकीने जामणी पारधी बेड्यावर दारू पिण्याकरिता आले होते. बेड्यावर यथेच्छ मद्यपान करून गावी निघाले. दरम्यान, भरधाव दुचाकी अभियंत्रित झाली व दूरपर्यंत घासत गेली. यात विजय हिवरे यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. माहिती मिळताच ठाणेदार प्रशांत पांडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद राऊत यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.(वार्ताहर)