चार अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 11:32 PM2018-08-05T23:32:05+5:302018-08-05T23:33:58+5:30

जिल्ह्यातील तीन ठिकाणी झालेल्या चार अपघातात दोन जण गतप्राण झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले. पहिला अपघात सेलू तालुक्यातील महाबळा शिवारात, दुसरा हिंगणघाट तालुक्यातील महामार्ग सात वरील नांदगाव चौक परिसरात, तिसरा व चौथा अपघात कारंजा तालुक्यातील सारवाडी शिवारात झाला.

Two killed in four accidents | चार अपघातात दोन ठार

चार अपघातात दोन ठार

Next
ठळक मुद्देतिघे गंभीर : महाबळा, नांदगाव, सारवाडी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील तीन ठिकाणी झालेल्या चार अपघातात दोन जण गतप्राण झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले. पहिला अपघात सेलू तालुक्यातील महाबळा शिवारात, दुसरा हिंगणघाट तालुक्यातील महामार्ग सात वरील नांदगाव चौक परिसरात, तिसरा व चौथा अपघात कारंजा तालुक्यातील सारवाडी शिवारात झाला. या चारही घटनांची पोलिसांनी नोंद घेतली आहे. दिलीप नत्थु मोहनावाले रा. कोळंबी ता. मंगरूळपीर जि. वाशीम व महादेव मोगरे रा. सारवाडी ता. कारंजा जि. वर्धा, अशी मृतकांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ट्रकची दुचाकीला धडक
हिंगणघाट - येथील राष्ट्रीय महामार्ग सात वरील नांदगाव चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. त्याला परिसरातील नागरिकांच्या मदतीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीपक वाकडे रा. शास्त्री वॉर्ड हिंगणघाट, असे जखमीचे नाव असल्याचे सांगण्यात आले. हा अपघात रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास झाला. हैद्राबादकडून टोमॅटो घेवून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या ए. पी. २१ टी. वाय. ९३३९ क्रमांकाच्या ट्रकने एम.एच.३२ ई. ७११५ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. सुरूवातीला जखमीला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, दीपकची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हिंगणघाट पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी ट्रक चालक रमन्ना किरपाल सुरकन्ना रा. कुरनुल्ला, आंध्र प्रदेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
महाबळा शिवारात मालवाहू अनियंत्रित होऊन उलटला
सेलू - नजिकच्या महाबळा शिवारात मालवाहू वाहन अनियंत्रित होत उलटले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. दिलीप नत्थु मोहनावाले रा. कोळंबी, जि.वाशीम, असे मृतकाचे नाव आहे. तो नागपूर येथून एम. एच. १८ ए. ए. ०३६५ क्रमांकाच्या मालवाहूत माल घेऊन वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीरच्या दिशेने जात होता. भरधाव मालवाहू महाबळा शिवारात आला असता अचानक वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान वाहन रस्ता दुभाजकावर आदळून पलटी झाले. यात ट्रक चालक दिलीप मोहनावाले याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास अशोक सांबारे, कपिल मेश्राम करीत आहेत.
रेतीचा ट्रक उलटला
सारवाडी - वाळू घेवून अमरावतीकडे जाणारा एम.एच. २७ एक्स. ६८५४ क्रमांकाचा ट्रक अनियंत्रित होत रस्त्याच्याकडेला जावून उलटला. ही घटना रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास बोरगाव व राजनी फाट्याजवळ घडली. या अपघातात ट्रकचा चालक व क्लिनर गंभीर जखमी झाले. त्यांना परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओव्हरटेकच्या नादात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. वृत्तलिहिस्तोवर जखमींची नावे कळू शकली नाही.
ट्रकने पादचाऱ्यास चिरडले
कारंजा (घा.) - नजीकच्या सारवाडी येथे भरधाव ट्रकने पादचाऱ्यास चिरडले. यात पादचाºयाचा जागीच मृत्यू झाला. महादेव मोगरे, असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. महादेव हा रस्ता ओलांडत असताना त्याला भरधाव असलेल्या अज्ञात ट्रकने धडक दिली. अपघात होताच ट्रकचालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची कारंजा पोलिसांनी नोंद घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Two killed in four accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात