पहाटेच्या अंधारात काम करताना मशीनखाली येऊन दोन मजूर ठार; वर्धा जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:29 PM2019-06-08T13:29:33+5:302019-06-08T13:29:55+5:30

वर्धा-आर्वी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावर पहाटे ४ च्या सुमारास सपाटीकरणाच्या मशीनखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.

Two laborers die under the machine while working in the darkness of the morning; Events in Wardha District | पहाटेच्या अंधारात काम करताना मशीनखाली येऊन दोन मजूर ठार; वर्धा जिल्ह्यातील घटना

पहाटेच्या अंधारात काम करताना मशीनखाली येऊन दोन मजूर ठार; वर्धा जिल्ह्यातील घटना

Next
ठळक मुद्देआंजी मोठी येथे अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: वर्धा-आर्वी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावर पहाटे ४ च्या सुमारास सपाटीकरणाच्या मशीनखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.
या मार्गावर असलेल्या आंजी मोठी सुकळीबाईच्या दरम्यान असलेल्या मौजा आंजी मोठी येथे मुरूमाच्या सपाटीकरणाचे काम सुरू होते. पहाटेच्या अंधारात मशीनला उजेड दाखवणाऱ्या विठ्ठल रामकृष्ण भुजाडे (४२) रा. खरांगणा याच्यासह बाजूला उभ्या असलेल्या विलास महादेव दोंदीलकर (५०) यांच्या अंगावरून हे मशीन गेल्याने ते दोघेही गंभीररित्या जखमी झाले. घटनास्थळी असलेल्या अन्य मजुरांनी या दोघांना सेवाग्राम येथे नेले असता विठ्ठल भुजाडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर विकास दोंदीलकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दरम्यान हा मशीनचालक फरार झाला आहे. खरांगणा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Two laborers die under the machine while working in the darkness of the morning; Events in Wardha District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात