उभ्या ट्रकधून दोन लाखांचे साहित्य लंपास
By admin | Published: February 28, 2015 12:16 AM2015-02-28T00:16:33+5:302015-02-28T00:16:33+5:30
देवळी मार्गावरीर सालोड येथे उभ्या असलेल्या एका ट्रकधून चोरट्याने साहित्य लंपास केले. यात एकूण एक लाख ९६ हजार २०० रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली.
वर्धा : देवळी मार्गावरीर सालोड येथे उभ्या असलेल्या एका ट्रकधून चोरट्याने साहित्य लंपास केले. यात एकूण एक लाख ९६ हजार २०० रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सातपुते याने येथील ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक साहित्यासह उभा ठेवला होता. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्याची दोरी कापून ट्रकमधील साहित्य लंपास केले. यात ४० हजार रुपयांच्या सिगारेट, १६ हजार रुपयांचे मोटरसायकलचे ट्यूब, दोन हजार रुपयांचे रेडिमेड कपडे, ५२ हजार रुपयांच्या आॅइल पेट्या, तीन हजार रुपयांचे वेल्डींग रॉड व १२ हजार रुपयांचा फ्रिज लंपास केला. ही चोरी कोणी केली याची माहिती अद्याप कळू शकली नाही. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. रस्त्याचर उभ्या असलेल्या या ट्रकमधून साहित्य लंपास झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.(प्रतिनिधी)