दोन लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:00:38+5:30
हरिदास विठोबाजी वैद्य (४५) रा. वॉर्ड क्रमांक ७, असे आरोपीचे नाव आहे. याचे भोग सभागृहामागे किराणा साहित्याचे गोदाम असून तेथून सुगंधीत तबाखूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी पथकासह जाऊन तपासणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : सुगंधीत तंबाखूची विक्री आणि साठा करण्यावर बंदी असतानाही देवळी येथील एका किराणा दुकानातून मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील भोंग सभागृहामागील किराणा साहित्याच्या गोदामात छापा घातला असता मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. पोलिसांनी दुकानमालकाला अटक केली असून त्याच्याकडून २ लाख १ हजार २२० रुपयाचा तंबाखू जप्त केला आहे. देवळी पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.
हरिदास विठोबाजी वैद्य (४५) रा. वॉर्ड क्रमांक ७, असे आरोपीचे नाव आहे. याचे भोग सभागृहामागे किराणा साहित्याचे गोदाम असून तेथून सुगंधीत तबाखूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी पथकासह जाऊन तपासणी केली.
तेव्हा दुकानात विविध प्रकारचा सुगंधी तंबाखू, पानमसाला याचा २ लाख १ हजार २२० रुपयांचा अवैध साठा आढळून आला. पोलिसांनी सर्व साठा जप्त करुन आरोपी हरिदास वैद्य यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.