दोन महिन्यातच उखडला सिमेंट रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:10 AM2018-06-25T00:10:43+5:302018-06-25T00:11:13+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पंचवीस पंधरा ग्राम विकास निधीतून उंदीरगाव येथे करण्यात आलेले सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात संबधित विभागाकडे नागरिकांनी लेखी तक्रार देवून अद्यापही दखल घेतली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पंचवीस पंधरा ग्राम विकास निधीतून उंदीरगाव येथे करण्यात आलेले सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात संबधित विभागाकडे नागरिकांनी लेखी तक्रार देवून अद्यापही दखल घेतली नाही. यामुभे कंत्राटदार व अधिकाऱ्यांत हातमिळवणी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
उंदीरगाव येथील प्रमोद बोरकुटे यांच्या घरापासून शांताराम बोरकुटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम गत सहा महिन्यापूर्वी करण्यात आले. यावेळी नागरिकांनी निकृष्ट दजार्चे काम होत असल्याबाबत कंत्राटदाराला सांगितले, मात्र याकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष करीत काम पूर्ण केले. सदर रस्त्याचे काम पंचवीस पंधरा ग्राम विकास निधीतून तीन लाख रुपये खर्चून करण्यात आले. या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी ठेवण्यात आला होता. तर या कामात दोष आढळल्यास १२ महिन्यांच्या आत दोष निवारण करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र दोन महिन्यातच या रस्त्यावर भेगा पडलेल्या आहे.
रस्त्यावरचे सिमेंट उखडले असल्याने गिट्टी उघडी पडली आहे. शिवाय रस्त्याच्या कडा खचल्याने रस्त्याचे काम दजार्हीन झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. येथील रस्त्यावर कामाच्या संदर्भात लावण्यात आलेल्या फलकावर कंत्राटदाराचे नाव नसल्याने नागरिकात विविध चचेर्ला उथान आले आहे. या सिमेंट रस्त्यावरील सध्या गिट्टी उघडी पडली असून हा रस्ता सिमेंटकरण केला अथवा खडीकरण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या संदर्भात ९ एप्रिल २०१८ रोजी येथील नागरिक प्रभाकर कोवराते यांनी बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी मुख्य अभियंता यांच्याकडे तक्रार केली; मात्र यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी उंदीरगाव येथील नागरिकांनी केली आहे.