दोन अपघातात दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 10:22 PM2018-02-15T22:22:34+5:302018-02-15T22:23:01+5:30
सेलू तालुक्यांतर्गत येणाऱ्या आमगाव मार्गावर एकाच ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले तर तीन जण किरकोळ जखमी झाले. दोन्ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली / बोरधरण : सेलू तालुक्यांतर्गत येणाऱ्या आमगाव मार्गावर एकाच ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले तर तीन जण किरकोळ जखमी झाले. दोन्ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडल्या. दोन्ही अपघात एकाच ठिकाणी झाल्याने येथे नागरिकांची गर्दी झाली होती.
पहिल्या अपघातात दुचाकी कारवर धडकली तर दुसऱ्या अपघातात दोन दुचाकी समोरामोर धडकल्या. पहिल्या अपघातात दुचाकी वाहन कारवर धडकले. यात एक जण गंभीर जखमी झाला. नितेश ऊईके रा. कोंढाळी असे गंभीर जखमीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तर एमएच ४०-एजे ६१५० क्रमांकाच्या दुचाकीने योगेश परतेकी, नितेश उईके व एक युवक असे तिघेही आमगाववरुन माळेगाव (ठेका) कडे जात होते. दरम्यान सामोरुन येणाऱ्या कारवर त्यांची दुचाकी आदळली. यात दुचाकीवरील नितीन उईके हा युवक गंभीर जखमी झाला असून योगेश परतेकी याला किरकोळ मार लागला. तर तिसऱ्या युवकाने घटनास्थळावरुन पळ काढला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हे तीनही युवक दारुच्या नशेत होते. या अपघातात कारचे बरेच नुकसान झाले. घटनास्थळाचा पंचनामा आंजी पोलीस चौकीचे ओमप्रकाश इंगोले यांनी केला असून यातील जखमीला सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता रवाना करण्यात आले आहे.
त्याच जागी पुन्हा अपघात
दुसºया अपघातात आमगाव येथून तीन युवक माळेगाव कडे जात होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकने धडक दिली. यात वाहन चालक सौरभ चलाख याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पंकज कवरतीच्या दोन्ही पायाचे गुढघे फुटले तर राहूल किरकोळ जखमी झाला. जखमींना सालई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेले असता तेथे कोणतीच सोय नसल्याने त्यांना सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उपस्थित वैद्यकिय अधिकारी शेख यांनी प्राथमिक उपचार करून सौरभला पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात रवाना केले.