‘त्या’ शेतविक्री प्रकरणी दोन संशयीतांना मुंबईत अटक, पथक आर्वीकडे रवाना
By admin | Published: March 7, 2017 01:12 AM2017-03-07T01:12:08+5:302017-03-07T01:12:08+5:30
मृतकाच्या नावावर तोतया व्यक्तीला उभे करून शेतीचा व्यवहार झाल्याचा गुन्हा येथे उघड झाला. या प्रकरणी दोन संशयीत म्हणून मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
एक तोतया भागवत असल्याचा संशय
आर्वी : मृतकाच्या नावावर तोतया व्यक्तीला उभे करून शेतीचा व्यवहार झाल्याचा गुन्हा येथे उघड झाला. या प्रकरणी दोन संशयीत म्हणून मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांची नावे प्रेम टोनपे आणि यशवंत कदम असे असून यातील एक तोतया अविनाश भावगत असल्याचा संशय आहे.
या दोघांना घेवून पोलिसांचे पथक आर्वीकडे रवाना झाले असून ते उद्या मंगळवारी पोहोचणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. आर्वी तालुक्यातील मौजा शहॉ. मोहम्मदपूर येथील शेत सर्व्हे न. ८ मधील २७ एकर शेती नाममात्र ३० लाख रुपयात परस्पर विकल्याचा खळबळजनक प्रकार घडला.
या प्रकरणी मृतकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. तपासाची चक्रे फिरवित आर्वी पोलिसांनी मुंबई येथील दोघांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे. या प्रकणातील मुख्य आरोपी सह अन्य ४-५ जण आणखी असल्याची चर्चा आहे.
यातील मुख्य आरोपी हा शातीर असल्याने तो अजूनही पोलीसांच्या अटकेबाहेर आहे. या प्रकरणात काही प्रतिष्ठीतांचा समावेश असल्याने प्रमुख आरोपी रोशन निमकर रा. श्रीराम वॉर्ड आर्वी हा पोलिसांना चकमा देत यशस्वी झाल्याची चर्चा आहे. अटकेतील संशयीतांचा या प्रकरणाशी संबंध असल्यास त्यांच्याकडून या २७ एकर शेत खरेदी प्रकरणात काय रहस्य बाहेर येते याकडे आर्वीकरांचे लक्ष आहे.(शहर प्रतिनिधी)