ट्रक दुचाकीच्या दोन अपघातात दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 10:22 PM2019-04-28T22:22:19+5:302019-04-28T22:22:49+5:30
देवळी तालुक्यातील भिडी आणि कारंजा (घा.) येथे रविवारी झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोघे ठार झाले तर दोघे गंभीर जखमी आहे. भिडी येथील बाभुळगाव चौफुलीवर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास के. ए. १४ बी. ३१५१ क्रमांकाच्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एम.एच. ३२ एल. ३५५ क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी/कारंजा (घा.) : देवळी तालुक्यातील भिडी आणि कारंजा (घा.) येथे रविवारी झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोघे ठार झाले तर दोघे गंभीर जखमी आहे.
भिडी येथील बाभुळगाव चौफुलीवर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास के. ए. १४ बी. ३१५१ क्रमांकाच्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एम.एच. ३२ एल. ३५५ क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही दोन्ही वाहने यवतमाळकडून देवळीच्या दिशेने येत होते. या अपघातात दुचाकीचालक अविनाश राऊत (२८) रा. मुरदगाव (येसगाव) हा युवक ट्रकच्या चाकात येवून जागीच ठार झाला. तर त्याच्या मागे बसलेले त्याची मामी शालिनी सोनवणे (४०) रा. नाचणगाव ही गंभीर जखमी झाली. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.
कारंजा (घा.) येथील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे.
गणेश नामदेव येरपुडे (३२) असे मृतकाचे नाव असून विलास वामन कुमेरिया (२७) हा गंभीर जखमी झाला. हे दोघेही जऊरवाडा (खुर्द) येथील रहिवासी असून एम.एच. ३२ डब्ल्यू ९५५६ क्रमांकाच्या दुचाकीने कारंजा येथील गोळीबार चौकातून कारंजा मार्केटकडे जात होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्गाने नागपुरकडून अमरावतीकडे जाणाऱ्या सी.जी. ०४ जे.डी.५०५६ क्रमांकाच्या ट्रकने जबर धडक दिली. या धडकेत गणेशच्या पायावरुन ट्रक गेल्याने गुडघ्यापासून पाय वेगळा झाला.
तसेच विकासही गंभीर जखमी झाल्याने दोघांनाही कारंजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन नागपुरकडे रवाना केले. परंतु नागरपुच्या मेडीकल हॉस्पीटलमध्ये उपचार घेण्यापूर्वीच गणेशचा मृत्यू झाला. तर विकासवर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. अपघातग्रस्त ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करुन पोलिसांनी चालकाला अटक करुन ट्रक जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.