दोन दुचाकी चोरट्यांना केले जेरबंद
By admin | Published: May 30, 2017 05:25 PM2017-05-30T17:25:17+5:302017-05-30T17:25:17+5:30
गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सावंगी पोलिसांना दोन दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. सदर चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीच्या
Next
ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 30 - गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सावंगी पोलिसांना दोन दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. सदर चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीच्या तब्बल आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. सलमान खाँ अजीज खाँ पठाण (२४) रा. कारला व शंकर कवडू पंधराम (२३) रा. गजानननगर असे अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी दररोज वेगवेगळी दुचाकी वापर असल्याची माहिती सावंगी पोलिसांना मिळली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरूवातीला शंकर पंधराम याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिकची माहिती जाणून घेतली असता शंकर जवळ असलेल्या दुचाकीचे कागदपत्रे त्याच्या जवळ नसल्याचे पुढे आहे. सुरूवातीला उडवा-उडवीचे उत्तरे देणाºया शंकरला पोलिसी हिसका मिळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीवरून पोलिसांनी सलमान खाँ अजीज खाँ पठाण यालाही ताब्यात घेतले. दोन्ही चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून विविध ठिकाणावरून चोरलेल्या एकूण आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मला देवी एस., अप्पर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडीले, सावंगीचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात रामदास बिसणे, पारडकर, प्रदीप राऊत, संघसेन कांबळे, विकास अवचट, नवनाथ मुंडे यांनी केली.
सलमान नागपूरातून तर शंकर दुचाकी चोरायचा वर्धेतून...
सावंगी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही चोरट्यांनी चोरीच्या दुचाकींची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन युक्ती लढविली होती. अटकेत असलेले दोन्ही आरोपी वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असले तरी सलमान हा नागपूरातील गर्दीच्या ठिकाणावरून तर शंकर हा वर्धेतील गर्दीच्या ठिकाणावरून दुचाकी लंपास करीत होता. नागपूरातून चोरलेली दुचाकी वर्धेत तर वर्धेतून चोरलेली दुचाकी विल्हेवाट लावण्यासाठी नागपूरात पाठविल्या जात असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.
दिली पाच गुन्ह्याची कबुली...
अटकेत असलेल्या चोरट्यांकडून चोरीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन दुचाकी चोरट्यांनी वर्धा जिल्ह्यातील सावंगी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून, एक रामनगर तर दोन दुचाकी नागपूर जिल्ह्यातून चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. उर्वरित तीन दुचाकींच्या मालकांचा शोध पोलीस घेत आहेत.
वडिलांच्या दुचाकीची नंबर प्लेट लावली चोरी केलेल्या दुचाकीला...
दुचाकी चोरटा सलमान खाँ अजीज खाँ पठाण याचेवर दारूविक्रीचे गुन्हे दाखल असून त्याने चोरी करून आणलेल्या दुचाकीची ओळख सहज पटू नये म्हणून चक्क वडिलांच्या दुचाकीची नंबर प्लेट काढून चोरीच्या दुचाकीला लावली होती. दोन्ही दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.