एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:24 PM2018-05-03T23:24:49+5:302018-05-03T23:24:49+5:30
वर्धा मार्गावरील स्थानिक कापसे पेट्रोल पंपजवळ एसटी बस अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. घटना घडल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही बस दोनशे फुट जावून रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जावून आदळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : वर्धा मार्गावरील स्थानिक कापसे पेट्रोल पंपजवळ एसटी बस अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. घटना घडल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही बस दोनशे फुट जावून रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जावून आदळली. ही घटना गुरुवारी दुपारी ११ वाजताच्या दरम्यान घडली.
पोलीस सुत्रानुसार, एस.टी. महामंडळाची एमएच ४० एक्यू ६३१३ या क्रमांकाची उमरेड-नागपूर-पुसद ही बस वर्धेवरून देवळीकडे जात होती. दरम्यान कापसे पेट्रोलपंप जवळ ट्रकला ओव्हरटेक करण्याचे प्रयत्नात या बसने विरूद्ध दिशेने येत असलेल्या एमएच ३२ एडी ०५४७ क्रमांकाच्या मोटारसायकलला चिरडले. यामध्ये मोटार सायकलस्वार अनंत भीमराव पवार (२८) रा. सावरगाव (डुकरे) ता. चिखली, जि. बुलढाणा हा जागीच ठार झाला. घटनेनंतर बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस उभ्या ट्रकवर जावून आदळली. यामध्ये बसचे व ट्रकचे नुकसान झाले. बसमधील प्रवासी शिला धोपटे रा. हिंगणघाट व इतर काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले.