ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By Admin | Published: September 4, 2015 02:08 AM2015-09-04T02:08:35+5:302015-09-04T02:08:35+5:30
नागपूर-वर्धा मार्गावर सेलू येथून दोन किमी अंतरावर उपाशा नाल्याजवळ ट्रेलरने मोटार सायकलला धडक दिली.
वर्धा-नागपूर मार्गावरील अपघात : अन्य एका अपघातात एक जखमी
सेलू : नागपूर-वर्धा मार्गावर सेलू येथून दोन किमी अंतरावर उपाशा नाल्याजवळ ट्रेलरने मोटार सायकलला धडक दिली. यात गंभीर जखमी दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रवीण मधुकर नेहारे (२९) रा. पुलगाव असे मृताचे नाव आहे. हा अपघात बुधवारी दुपारी झाला.
मोटार सायकल चालक प्रवीण दुचाकी क्र. एम.एच. ३१ बी.जे. ९१०५ ने गावाकडे जात होता. दरम्यान, ट्रेलर क्र. सी.जी. ०४ जे.डी. ९८७० च्या चालकाने वाहन भरधाव चालवून दुचाकीला धडक दिली. यात प्रवीण गंभीर जखमी झाला. सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
उभ्या ट्रकला कारची धडक चालक जखमी
नागपूर-वर्धा मार्गावर कोटंबा फाट्यानजीक उभ्या असलेल्या ट्रेलरला कारने धडक दिली. यात कार चालक सौरभ निरंजन शेलकर रा. आयुर्वेदिक ले-आऊट नागपूर जमखी झाला. सौरभ आपल्या कार क्र. एम.एच. ४० ए.सी. ७६४७ ने नागपूरकडे जात होता. रस्त्यात उभा असलेला ट्रेलर क्र. सी.जी. ०७ सी. ७१७३ काळोखामुळे न दिसल्याने कार त्यावर आदळली. यात कार चालक गंभीर जखमी झाला. त्याचेवर नागपूर येथे उपचार सुरू आहे.
शेताच्या धुऱ्यावरून दोन कुटुंबात वाद, चार जखमी
घोराड येथे पोहाणे व गोमासे या शेतकऱ्यांमध्ये धु्ऱ्यावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात दोन्ही कुटुंबातील चार जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी दुपारी १२.३० वाजता घडली. नामदेव श्रीराम गोमासे व तुकाराम श्रीराम गोमासे या भावंडांचे अमोल वामन पोहाणे व लोकेश वामन पोहाणे या भावंडाशी शेताच्या धुऱ्यावरून भांडण झाले. यात दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना काठ्यांनी मारहाण केली. दोन्ही गटातील शेतकरी जखमी झाले. तक्रारीवरून सर्वांवर ३२४ (३४), ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)
ट्रकसह पावणे सात लाखांचा रेतीसाठा जप्त
वर्धा - देवळी पोलिसांनी रेतीची अवैध वाहतूक करीत असलेल्या वाहनाची तपासणी करून कारवाई केली. यात ट्रॅक्टर क्र. एम.एच. ३२ पी. ३१२५ व १.५० ब्रास रेती, असा ६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई देवळी परिसरात गुरूवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी वाहन अडविताच रूपेश फटींग व संजय ताडाम या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
गिरड - मौजा फरिदपूर येथे दुपारी १२ वाजता शेख कलीम शेख सलीम (२४) याने राहत्या घरी शेतातील विषारी औषध प्राशन केले; पण आई घरी असल्यामुळे त्याच्याकडून औषध हिसकावले. त्याला गिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी व सहकाऱ्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले; पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास गिरड पोलीस करीत आहेत.
इमसाचा मृत्यू
वर्धा - वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल रमेश इवनाते (४०) रा. कुटकी या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्राप्त माहितीवरून वडनेर पोलिसांनी गुरूवारी अमस्मात मृत्यूची नोंद केली. विषारी औषध प्राशन केल्याने इसमावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.