वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:29 PM2018-08-30T22:29:37+5:302018-08-30T22:30:02+5:30

नागपुरकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमाक सातवरुन दोन युवक दुचाकीने हिंगणघाटकडे जात होते. यादरम्यान हळदगाव शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. हा अपघात बुधवारला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास झाला असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गभीर जखमी आहे.

Two wheelers killed in vehicle crash | वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next
ठळक मुद्देएक गंभीर : हळदगाव शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : नागपुरकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमाक सातवरुन दोन युवक दुचाकीने हिंगणघाटकडे जात होते. यादरम्यान हळदगाव शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. हा अपघात बुधवारला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास झाला असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गभीर जखमी आहे.
सार्थक निळकंठ बाभुळकर (२७) रा. हिंगणघाट असे मृत युवकाचे नाव आहे तर त्याचा मित्र महेश प्रेमराज जांभुळे (३२) हा गंभीर जखमी झाला आहे. हे दोघेही एम.एच.३२ ए.सी. ६४५३ क्रमांकाच्या दुचाकीने नागपुरकडून हिंगणघाटकडे येत होते. रात्रीच्या सुमारास हळदगांव शिवारात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात सार्थक जागीच गतप्राण झाला तर महेश हा गंंभीर जखमी झाला. अपघाताची माहीती मिळताच जाम महामार्ग वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भरत कऱ्हाडे यांंच्यासह पोलीस कर्मचारी गौतम तिरपुडे, शरद इंगोले, राजु बेले, गौरव खरवडे, गणेश पवार यांनी घटनास्थळ गाठून जखमी असलेल्या महेश जांभुळे याला रुग्णवाहीकेने समुद्रपुरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.
ट्रक पलटला
वडनेर - बोपापूर (पो.) नजीक ट्रकचा टायर फुटल्याने टी.एन.५२ एच. ८८७१ क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या बाजुला जाऊन पलटी झाला. ही घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास झाली. चालक गोविदराज हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Two wheelers killed in vehicle crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात