अखेर ठरलेल्या मुहूर्तावर अतिक्रमण हटले

By admin | Published: June 27, 2017 01:19 AM2017-06-27T01:19:28+5:302017-06-27T01:19:28+5:30

येथील बस स्थानक परिसर आणि महामार्गालगतचे दोही बाजुचे रोड अतिक्रमणांच्या विळख्यात होते. यामुळे या मार्गावर अनेक अपघात झालेत.

Ultimately, encroachment took place at the time of Muhurta | अखेर ठरलेल्या मुहूर्तावर अतिक्रमण हटले

अखेर ठरलेल्या मुहूर्तावर अतिक्रमण हटले

Next

पोलीस बंदोबस्त : बेरोजगाराची समस्या सोडविण्याकडेही लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा(घा.) : येथील बस स्थानक परिसर आणि महामार्गालगतचे दोही बाजुचे रोड अतिक्रमणांच्या विळख्यात होते. यामुळे या मार्गावर अनेक अपघात झालेत. यामुळे सामान्य जनता परेशान झाली होती. अतिक्रमण काढण्याकरिता अनेकवार नोटीस बजावण्यात आली. मात्र अतिक्रमण काढण्यात आले नाही. अखेर २४ जून रोजी सकाळी १० वाजतापासून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.
शहरवासियांनी अतिक्रमणामुळे होणाऱ्या त्रासाची तक्रार कारंजा नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली, असता मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी ओरियंटल पाथवे कंपनीला अतिक्रमण हटविण्याकरिता लेखी पत्र दिले. यावर ओरिंयंटल पाथवे कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरनी जवळपास १५० अतिक्रमण धारकांना नोटीस देवून २३ जून पर्यंत अतिक्रमण हटवा, अन्यथा पोलिसबळ वापरून २४ जूनला अतिक्रमण हटविल्या जाईल अशी तंबी दिली होती.
या तंबीनुसार ठाणेदार, पोलीस स्टॉप, ओरियंटलचे प्रोजेक्ट आॅफिसर अग्रवाल यांनी बुलडोझर सोबत घेवून महामार्ग क्र.६ चे दोन्ही बाजुच्या अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या. अनेकांनी अतिक्रमण काढले, पण काहींनी विरोध केला असता त्यांचे अतिक्रमण जबरदस्तीने हटविण्यात आले.
२३ जूनला शिवसेनेच्या काही नेत्यांनी अतिक्रमण धारकांना सोबत घेवून अस्थायी स्वरुपाचे अतिक्रमण करणाऱ्यांचे ठेले किंवा झोपडी व दुकाने हटवू नये. ते हटविल्यास बेरोजगारी व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, अशी बाजू मांडण्यासाठी ठाणेदार, नगरपंचायत सीओ व तहसीलदाराची भेट घेतली. पण अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होवून सर्वसामान्य जनतेच्या जीवन दृष्टीकोनातून अतिक्रमण हटविणे गरजेचे असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटवितांना काही अनुचित प्रकार तर घडणार नाही ना, अशी भीती, सामान्य जनतेत होती; पण अतिक्रमण हटविणारे अधिकारी आणि अतिक्रमण धारक यांच्यातील सामंजस्य पूर्ण भूमिकेमुळे अतिक्रमण हटाव मोहीम शांततेत पार पडली.

Web Title: Ultimately, encroachment took place at the time of Muhurta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.