अखेर पुलफैलातील आरोग्य केंद्रात ओपीडी कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:10 AM2018-06-02T00:10:03+5:302018-06-02T00:10:03+5:30
बहुचर्चित ठरलेल्या स्थानिक पुलफैल येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अखेर ओपीडी सेवा शुक्रवारी कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाला न.प. आरोग्य सभापती गुंजन मिसाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बहुचर्चित ठरलेल्या स्थानिक पुलफैल येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अखेर ओपीडी सेवा शुक्रवारी कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाला न.प. आरोग्य सभापती गुंजन मिसाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उल्लेखनिय म्हणजे याप्रसंगी त्यांनी स्वत: आरोग्य तपासणी करून घेतली.
स्थानिक पुलफैलातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज इमारत तयार होऊनही विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत होते. तेथून नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी न.प. प्रशासनाला वैद्यकीय अधिकारीच मिळत नव्हता. अखेर २६ मार्चला न.प.च्या सर्वसाधारण सभेत पुलफैल व सानेवाडी भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयाला सुरू करण्यासाठी देण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. गत काही दिवसांपासून न.प.च्या आरोग्य व स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचारी सुसज्य इमारत व योग्य सोयी-सुविधा असलेल्या पुलफैल येथील आरोग्य केंद्रातून त्वरित नागरिकांना चांगली आरोग्य सेवा कशी देता येईल या हेतूने युद्धपातळीवर कार्य करीत होते. अखेर त्याच्या प्रयत्नांना आज यश आले आहे. या कार्यक्रमाला आरोग्य विभाग प्रमुख प्रविण बोरकर, डॉ. मेहंदले, डॉ. पुनम सोलंके, डॉ. महेंद्र डांगे, डॉ. डी. जी. डंभारे, नगर सेवक परवेज हसन खान, पद्मा रामटेके, सतीश मिसाळ, सपना गायकवाड, राणी हेडावू, जयश्री पाटील, सोनु मैस्कर, करुणा नाखले, लक्ष्मी कुरील, राणी रामटेके, विशाल रामटेके, जुबेर शेख, शेख नदीम, वसीम पठाण, प्रशांत रामटेके, नईम कुरेशी, जलील कुरेशी, निहाल गुजर, सौरभ ठाकुर, सुरज बडगे आदी हजर होते.