कारंजा तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:40 PM2019-03-29T23:40:09+5:302019-03-29T23:40:17+5:30

तालुक्यात भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. ज्या गावात दररोज पाणी येत होते, दरवर्षी पाण्याची समस्या उद्भवूनही तिसऱ्या दिवशी नळ यायचे. यावर्षी मात्र पाच ते सहा दिवसांनंतर नळ येत आहेत. शासनाने विहिरी, बोअरवेल अधिग्रहित केल्या असल्या तरी या विहिरी आणि बोअरवेलची पातळीदेखील खालावल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

undefined | कारंजा तालुक्यात भीषण पाणीटंचाई

कारंजा तालुक्यात भीषण पाणीटंचाई

Next
ठळक मुद्देपाण्याकरिता मोजावे लागताहेत पैसे : बोअरवेल, विहिरींची जलपातळीही खालावली

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : तालुक्यात भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. ज्या गावात दररोज पाणी येत होते, दरवर्षी पाण्याची समस्या उद्भवूनही तिसऱ्या दिवशी नळ यायचे. यावर्षी मात्र पाच ते सहा दिवसांनंतर नळ येत आहेत. शासनाने विहिरी, बोअरवेल अधिग्रहित केल्या असल्या तरी या विहिरी आणि बोअरवेलची पातळीदेखील खालावल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही गावात दुसरी विहीर किंवा बोर अधिग्रहण करण्याची शासनाची तयारी असल्याची बोेलले जात आहे.
तालुक्यातील बोंदरठाणा येथे तर भीषण पाणी समस्या असून अधिग्रहण केलेल्या विहिरीचे पाणी अपुरे पडत आहे. पाच ते सहा दिवसांनंतर नळ सोडण्यात येत असल्याने लहान मुलापासून तर वृद्ध, स्त्री, पुरुष पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. काही गावकरी दोघा-तिघांमिळून टॅँकरने पाणी विकत घेत आहेत. राजनी, बोरगाव, उमरी, बोटोणा, किन्हाळा, एकार्जुन, खरसखांडा, गवंडी, भालेवाडी येथे भीषण पाणी समस्येने उग्ररूप धारण केले आहे. एप्रिल, मे महिन्यात यापेक्षाही भयानक स्थिती असेल, असे संकेत आहेत. टंचाईमुळे नागरिकांसोबतच जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील एकमेव खैरी धरण कोरडे होण्याच्या मार्गावर आहे. खैरी धरणावरील नारा अधिक २२ योजना पाणीसमस्येमुळे निरर्थक ठरली आहे.
 

Web Title: undefined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.