समजून घ्या ‘केमिकल लोचा’
By admin | Published: October 12, 2014 11:48 PM2014-10-12T23:48:21+5:302014-10-12T23:48:21+5:30
मानसिक आजारामुळे समजावर तसेच रुग्णांवर होणाऱ्या परिणामाबाबत माहिती देण्यासाठी मानसिक आरोग्य सप्ताहातून आरोग्य प्रशासन विविध उपक्रम राबविते. मानसिक आरोग्याबाबत माहिती
वर्धा : मानसिक आजारामुळे समजावर तसेच रुग्णांवर होणाऱ्या परिणामाबाबत माहिती देण्यासाठी मानसिक आरोग्य सप्ताहातून आरोग्य प्रशासन विविध उपक्रम राबविते. मानसिक आरोग्याबाबत माहिती जाणून घ्या, समजून घ्या केमिकल लोचा... असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मिलींद सोनोने यांनी कर्मचाऱ्यांना केले.
मानसिक आरोग्य जागृती सप्ताहात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मानसिक आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी तसेच या आजारापासून असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रभातफेरी काढून नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले.
तसेच चित्राच्या माध्यमातून या आजाराची लक्षणे व उपाय याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाल अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. धुर्वे, डॉ. इंदूरकर, डॉ. काळे, अधिसेविका पुनसे, मनोविकारतज्ञ डॉ. सोनोने आदींनी मार्गदर्शन केले.
मानसिक आरोग्य सप्ताहामध्ये तणाव व्यवस्थापन, मानसिक आरोग्य आणि उपाय, मतिमंद विद्यार्थ्यांची घ्यावयाची काळजी, व्यसनधिनता आदी विषयावर विविध उपक्रमांचे आयोजन करुन जागृती करण्यात येणार आहे.
जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठीही मानसिक आरोग्याबाबत जागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन सुजाता पारेकर यांनी केले तर आभार कुंदा बेडकर यांनी मानले.
यावेळी चारूलता कडू, गिता थूल, मिना वाहने, स्वाती रामटेके, राहुल कठाणे, मंगेकर, प्रकाश कुलसुंगे, शहा, गाठे, विधी सेवा प्राधिकरणाचे गिरीवार तसेच जिल्हा मानसिक आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)