वकील संघाचे केंद्रीय कायदा मंत्र्यांना निवेदन

By admin | Published: April 22, 2017 02:16 AM2017-04-22T02:16:13+5:302017-04-22T02:16:13+5:30

येथील वकील संघाच्या सदस्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय कायदा मंत्र्यांना अन्यायकारक ठरणारे

The Union Law Minister's request to ministers | वकील संघाचे केंद्रीय कायदा मंत्र्यांना निवेदन

वकील संघाचे केंद्रीय कायदा मंत्र्यांना निवेदन

Next

आर्वी : येथील वकील संघाच्या सदस्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय कायदा मंत्र्यांना अन्यायकारक ठरणारे विधेयक न पारीत करण्याच्या मागण्यांचे निवेदन पाठविले आहे.
निवेदनातून लॉ कमिशन द्वारे केंद्र शासनाकडे अ‍ॅडव्होकेट(दुरुस्ती) बोल २०१७ प्रस्तावित करण्यात आले आहे. सदर विधेयक वकीलांच्या हिताचे नसून वकीलांवर अन्यायकार असल्यामुळे ते मंजूर न करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मंजुरीकरिता शासनाकडे प्रस्तावित असलेल्या विधेयकात वकीलांच्या दृष्टीने जाचक अटींचा समावेश आहे. सदर विध्येयक मंजूर झाल्यास वकीलावर अन्याय होईल, असे निवेदन कर्त्यांचे म्हणणे असून सदर विधेयकाचा तीव्र विरोध निवेदनातून करण्यात आला आहे. वकीलांसाठी अन्यायकारक ठरणारे निवेदन न पारीत करण्यात यावे या मागणीच्या निवेदनावर वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक धारस्कर, अ‍ॅड. दीपक मोटवाणी, अ‍ॅड. चंद्रशेखर डोंगरे, अ‍ॅड. चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.(तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: The Union Law Minister's request to ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.