एसटी कामगारांचा बेमुदत संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:33 PM2017-10-17T23:33:52+5:302017-10-17T23:34:02+5:30

एसटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी संबंधीतांना निवेदने दिलीत.

The untimely end of ST workers | एसटी कामगारांचा बेमुदत संप

एसटी कामगारांचा बेमुदत संप

Next
ठळक मुद्देलालपरी धावलीच नाही : ऐन दिवाळी सणा दरम्यान प्रवाशांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एसटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी संबंधीतांना निवेदने दिलीत. परंतु, अद्यापही मागण्यांची पूर्तता न झाल्याचा ठपका ठेवत मंगळवार १७ आॅक्टोबरपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे मंगळवारी जिल्ह्यात एकही बस धावली नाही. याचा नागरिकांना ऐन दिवाळीच्या तोंडावर चांगलाच त्रास सहन करावा लागला.
शासकीय व इतर क्षेत्रातील कर्मचाºयांपेक्षा एसटी कर्मचाºयांचे वेतन कमी असून ते अल्प वेतनात नागरिकांना सुविधा देत आहेत. त्यांना समाधानकारक वेतन देण्यात यावे. १ जुलै २०१६ पासून देय होणारा ७ टक्के वाढीव महागाई भत्ता शासकीय कर्मचाºयांना लागू करून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होवूनही रापमच्या कर्मचाºयांना तो अद्यापही लागू करण्यात आला नाही. रापमच्या कर्मचाºयांना महागाई भत्ता लागू करण्यात यावा. कामगारांच्या हिताचा असलेला वेतन करार करण्यास चालढकल होत असून तो करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
सदर संपात महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस इंटक महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार संघटना, विदर्भ एस. टी. कामगार संघटना, संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. मंगळवारी करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील एकूण १ हजार ६६२ कामगार सहभागी झाल्याने वर्धा जिल्ह्यातील रापमची प्रवासी वाहतूक सेवा पूर्णपणे खोळंबली होती. एकही बस मंगळवारी न धावल्याने नागरिकांना खासगी प्रवासी वाहनांचा वापर करावा लागला.
बसस्थानकामध्ये स्मशान शांतता
मध्यरात्रीपासून रामपच्या कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सूरू केले. या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाची एकही बस जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा बसस्थानकावर पोहोचली नाही. तर येथून सूटली नाही. ऐरवी विद्यार्थी व प्रवाशांनी गजबजून राहणाºया वर्धा बसस्थानकावर आज स्मशान शांतता होती.
छोट्या व्यावसायिकांना फटका
जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात खाद्यपदार्थ विक्री करून अनेक नागरिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु, आजच्या संप आंदोलनामुळे खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाºयांसह ओटो चालकांना आर्थिक फटका सहन करावा लागला.

Web Title: The untimely end of ST workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.