पीएम किसान'चे अपडेट् केले; ७० वर शेतकऱ्यांचे बँक खाते साफ झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 05:57 PM2024-10-04T17:57:09+5:302024-10-04T17:58:04+5:30

Vardha : शेतकऱ्यांनी फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन

Updated by PM Kisan; At 70, the bank account of the farmers was cleared | पीएम किसान'चे अपडेट् केले; ७० वर शेतकऱ्यांचे बँक खाते साफ झाले

Updated by PM Kisan; At 70, the bank account of the farmers was cleared

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो. मात्र, याच योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या योजनेचे खाते अपडेट करा, म्हणून लिंकचा मेसेज येतो, आणि शेतकऱ्यांच्या बँकेचे खातेच रिकामे होत असल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे दररोज प्राप्त होत आहेत. त्यामुळे या फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.


मागील काही दिवसांपासून सोशल मीडियातून पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली आपले खाते अपडेट करा, आपला पंतप्रधान सन्मान निधी जमा झाला का तपासा, तुमचा अडकलेला हप्ता मिळवा, अशा एक ना अनेक प्रकारच्या मेसेजमधून अशी एक एपीके लिंक व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यानंतर फोनमध्ये अप्लिकेशन डाऊनलोड होते. त्यानंतर मोबाईल आणि सीमकार्ड हॅक होऊन बंद पडते. अशा प्रकारे फसवणूक केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा फसव्या लिंकपासून वेळीच सावध व्हावे, कोणतेही मेसेज आणि लिंक आल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. 


ई-केवायसीच्या नावे फसवणूक 
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी ई-के- वायसी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला कोणताही कॉल, मेसेज किंवा कोणतीही अनोळखी लिंक आली असेल तर चुकून ही त्यावर क्लिक करु नका, अन्यथा फसवणूक करणारे तुमची फसवणूक करु शकतात.


काय काळजी घ्याल ? 
या योजनेंतर्गत अनेक शेतकरी आहेत ज्यांना मागील हप्त्याचा लाभ मिळू शकलेला नाही. यामागे कारणे असू शकतात. मात्र, जर कुणी तुम्हाला हप्ता मागितला आणि त्याबदल्यात तुमच्याकडून पैसे घेतले तर तुम्ही सावध व्हा, कारण असे लोक तुमच्याकडून पैसे घेतात. आपली गोपनीय बैंकिंग माहिती देणे टाळा. तरच अशा फसवणुकीपासून तुम्ही वाचाल.


सायबरकडे नऊ महिन्यांत ८० वर तक्रारी
जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधी पीएम किसान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तब्बल ८० वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काहींनी गुन्हा दाखल करण्यास मनाई केली, तर काहींची किरकोळ स्वरुपात रक्कमही गेल्याने त्यांनी तक्रार देण्यास टाळले. मात्र, ही फसवणूक सध्या वाढतच चालली आहे.

Web Title: Updated by PM Kisan; At 70, the bank account of the farmers was cleared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.