नागरी उपजीविका अभियान राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:08 AM2018-01-02T00:08:32+5:302018-01-02T00:08:57+5:30
नागरी भागातील नागरिकांसाठी उपजीविकेचे साधने निर्माण करुन त्यांच्यातील दारिद्रय निर्मूलनासाठी यंत्रणा उभारावी.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : नागरी भागातील नागरिकांसाठी उपजीविकेचे साधने निर्माण करुन त्यांच्यातील दारिद्रय निर्मूलनासाठी यंत्रणा उभारावी. या माध्यमातून त्यांची क्षमता वाढवावी. तसेच गरीब कुटूंबातील व्यक्तींना उपजिविकेच्या जास्तीतजास्त संधी उपलब्ध करुन देऊन कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यावे. यामुळे त्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होईल, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केल्या.
नागरी भागातील लघु उद्योगांना चालना देण्यासाठी नगर परिषदांनी प्रयत्न करावे. बेघर लोकांसाठी कायमस्वरुपी व मुलभूत सोयी सुविधा असलेल्या निवाºयाची व्यवस्था करावी, असे जिल्हाधिकारी नवाल यांनी हिंगणघाट शहरासाठी लागू असलेली अमृत योजना, शहर स्वच्छता मोहीम व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाबाबत घेतलेल्या नगरपरिषद आढावा बैठकीत सांगितले.
राष्ट्रीय उपजिविका अभियानाच्या अंमलबजावणीत हयगय करणाºया कर्मचारी व बचत गटावर सक्त कारवाई करण्यात येईल, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी नवाल यांनी दिले. विविध विषयावर सूचना केल्या. या बैठकीला नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हयगय केल्यास कारवाई
फेरीवाल्याच्या उपजिविकेच्या समस्या नगर परिषदेने सोडवून त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. त्याचप्रमाणे शहर स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती अभियानाची यशस्वी अमलंबजावणी करावी, असे त्यांनी केले. यामध्ये हयगय केल्यास कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले.