सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट वापरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 01:08 AM2017-08-06T01:08:03+5:302017-08-06T01:08:26+5:30
सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वाहन चालविताना हेल्मेटचा वापर किती महत्त्वाचा आहे याची जनजागृती करण्याकरिता शनिवारी सकाळी स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयातून दुचाकी रॅली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वाहन चालविताना हेल्मेटचा वापर किती महत्त्वाचा आहे याची जनजागृती करण्याकरिता शनिवारी सकाळी स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयातून दुचाकी रॅली काढण्यात आली. हा उपक्रम पोलीस विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. रॅलीने शहरातील मुख्य मार्गांनी मार्गक्रमण केले.
पोलीस अधीक्षक कार्यालयातून निघालेल्या या जनजागृती दुचाकी रॅलीत हेल्मेट घातलेले १०० पोलीस सहभागी झाले होते. जनजागृती रॅलीने बजाज चौक, शास्त्री चौक, शिवाजी चौक, आर्वी नाका चौक, आरती टॉकीज चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक मार्गक्रमण केले. रॅलीचा समारोप पोलीस अधीक्षक कार्यालयात झाला.
रॅलीला पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी हिरवी झेंडी दाखविली. रॅलीत अप्पर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव, रामनगरचे ठाणेदार विजय मगर, वर्धा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके आदी सहभागी झाले होते.
अशी होणारी अंमलबजावणी
सुरूवातीला पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाºयांना नंतर शासकीय कर्मचाºयांना व त्यानंतर सर्वसामान्य नागरिक असे नियोजन हेल्मेट बाबत केले जात आहे. त्यासाठी संबंधीतांशी पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहापोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.