विद्यार्थ्यांवर दबावतंत्राचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:41 PM2018-08-27T22:41:51+5:302018-08-27T22:42:28+5:30
नजिकच्या भूगाव येथील अनुसयाबाई मेघे कृषी महाविद्यालयात सोमवारी अकोला येथील डॉ. पंजाबराव विद्यापीठ अकोला येथील काही अधिकाऱ्यांनी येत या महाविद्यालयावर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. आपण इतर महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे सांगत त्याबाबत दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात काही वेळ तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : नजिकच्या भूगाव येथील अनुसयाबाई मेघे कृषी महाविद्यालयात सोमवारी अकोला येथील डॉ. पंजाबराव विद्यापीठ अकोला येथील काही अधिकाऱ्यांनी येत या महाविद्यालयावर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. आपण इतर महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे सांगत त्याबाबत दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात काही वेळ तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी सावंगी पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी या प्रकरणी काय कार्यवाही केली हे वृत्तलिहिस्तोवर कळू शकले नाही.
शैक्षणिक सत्र २०१८-१९ संदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. या बाबत २-३ दिवसात निकाल लागण्याची शक्यता आहे. या शाळेवर प्रशासक नेमले आहे. याच दरम्यान अकोला येथील विद्यापीठातील काही अधिकारी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येणार असल्याचा ई-मेल २४ रोजी प्राप्त झाला. त्या अनुषंगाने सोमवारी डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला येथील राम गावंडे, के. डब्ल्यू बोने, पी. एस. साळुंके यांनी भुगाव भागातील सदर महाविद्यालय गाठले. यावेळी सुरूवातीला त्यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रकरण न समजावून सांगता त्यांना पोलिसांचा धाक दाखवून त्यांच्या खाजगी विद्यालयाच्या नाव असलेल्या फार्मवर स्वाक्षऱ्या घेण्यास सुरूवात केली. हा प्रकार आपल्यावर अन्यायकारक असल्याचा ठपका ठेवत विद्यार्थ्यांनी सदर अधिकाऱ्यांना विचारणा केली. परंतु, त्यांचकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.