बंधाऱ्याच्या कामात मातीमिश्रित वाळूचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:39 AM2019-02-13T00:39:25+5:302019-02-13T00:40:24+5:30
नजीकच्या सुरगाव येथे बंधारा दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. परंतु, सदर कामात सर्रास मातीयुक्त रेती वापरली जात असून कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : नजीकच्या सुरगाव येथे बंधारा दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. परंतु, सदर कामात सर्रास मातीयुक्त रेती वापरली जात असून कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे. याच कामात गैरप्रकार होत असल्याचा ठपका ठेऊन ते ग्रामस्थांनी यापूर्वी बंद पाडले होते, हे विशेष.
सिमेंट बंधारा आणि सुर नदीच्या खोलीकरणासाठी महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली कलोडे यांनी १९ लाख १३ हजारांचा निधी खेचून आणला. खोलीकरणामुळे या भागातील शेतकºयांना दिलासा मिळेल आणि त्यांची सिंचनाची समस्या निकाली निघेल अशी अपेक्षा होती. परंतु, कंत्राटदार त्याला हरताळ फासत असल्याचे चित्र बघवयास मिळत आहे. ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या शेताजवळील सिमेंट बंधाºयाला जागोजागी तडे गेल्याने त्यात पाहिजे तसी पाणी अडत नव्हते. त्यामुळे बंधाºयाच्या दुरूस्तीची गरज होती. दर्जेदार पद्धतीने दुरूस्तीचे काम होणे क्रमप्राप्त असताना कंत्राटदाराकडून चक्क मातीयुक्त रेतीचा वापर केल्या जात आहे. शिवाय या प्रकाराकडे देखरेखीची जबाबदारी असलेल्यांचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये उलट-सुटल चर्चेला उधाण आले आहे. याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांसह शेतकºयांची आहे.