पाण्याअभावी योजनांची उपयोगिता शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:19 PM2017-09-09T23:19:01+5:302017-09-09T23:19:19+5:30

शहर विकासाचा वेग काहीसा मंद असला तरी निधीचा सुकाळ आहे. शहर विकासासाठी विशेष निधी म्हणून १० कोटी, अमृत योजनेला ६२ कोटी, नदीवर उड्डान-पुलाकरिता २० कोटी तर शहर विकासासाठी २० कोटी मिळणार, ही घोषणा झाली.

The usefulness of the schemes due to lack of water is zero | पाण्याअभावी योजनांची उपयोगिता शून्य

पाण्याअभावी योजनांची उपयोगिता शून्य

Next
ठळक मुद्देनवीन बंधाºयाची गरज : साठवण क्षमतेअभावी होणार समस्या तीव्र

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शहर विकासाचा वेग काहीसा मंद असला तरी निधीचा सुकाळ आहे. शहर विकासासाठी विशेष निधी म्हणून १० कोटी, अमृत योजनेला ६२ कोटी, नदीवर उड्डान-पुलाकरिता २० कोटी तर शहर विकासासाठी २० कोटी मिळणार, ही घोषणा झाली. ही बाब शहरासाठी सुखावह असली तरी पाण्याअभावी हा विकास शून्यच दिसणार आहे. पाणी साठविण्यासाठी बंधाराच नसल्याने पिण्यासाठी तरी पाणी मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जलसंचय वाढावा म्हणून वणा नदीवर नव्या बंधाºयाची गरज आहे. पाण्यासाठी दीर्घकालीन योजना आखून बंधाºयाची निर्मिती गरजेची आहे. अन्यथा पाणी समस्या उग्र रूप धारण करणार आहे. नगर पालिकेकडे सध्या पाण्याच्या जुन्या टाक्या आहे. अमृत योजनेंतर्गत १० पाण्याच्या टाक्या नव्याने बांधणार आहे. हे काम सुरू आहे. नवीन पाईपलाईन, पम्पिंग स्टेशन, जलशुद्धीकरण प्रकल्प ही सर्व सुविधा उपलब्ध होत असून काम सुरू आहे; पण नदीत पाणीच साठत नसल्याने यंत्रणेचा उपयोग शून्य आहे. जलसंचय करणारी यंत्रणा, पालिकेकडे नसल्याने उन्हाळ्यात टंचाई जाणवते. जुना बंधारा वादग्रस्त असल्याने त्यात आणखी किती वेळ घालविणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवीन बंधारा बांधायचा झाल्यास दोन-तीन वर्षे लागतील. यामुळे पुन्हा टंचाईचा सामना करावा लागणार आहे. टंचाईची स्थिती लक्षात घेत जुन्या वादग्रस्त बंधाºयाकडे दुर्लक्ष करीत नवीन बंधाºयाची निर्मिती करणे गरजेचे झाले आहे. यावर लक्ष केंद्रीत करण्याची मागणी होत आहे.
पूर्वीचे प्रकरण न्यायप्रविष्ट
जलसंचयाकरिता वणा नदीवर बंधारा प्रस्तावित होता. बंधाºयाचे बांधकामही सुरू करण्यात आले होते. यात संपूर्ण निधी खर्ची घालण्यात आला; पण बंधारा पूर्ण झाला नाही. बंधाºयाचा काही भाग पुरात वाहून गेला. अनेकांनी हा निकृष्ट असल्याचा आरोप केला व प्रकरण न्यायालयात प्रविष्ट झाले. यावर निकालही लागला. हे घडल्यानंतरही बंधारा पूर्ण झाला नाही. आता पाणी संग्रहणासाठी हा बंधारा पूर्ण करणार की दुसरा बांधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बंधारा का गरजेचा
पाणीटंचाई जाणवत असल्याने पालिकेने पाटबंधारे विभागाकडून १५ लाख रुपये खर्च करुन १.५ दशलक्ष घनमीटर पाणी घेतले. यामुळे त्यावेळी पाणीसाठा होता. या पाणी साठ्याने त्यावर्षी भागले. शहराला पाण्याचे दुर्भीक्ष जाणवले नाही. २०१७ च्या उन्हाळातही पाणीटंचाई जाणवल्याने वणा नदीला तीन वेळा पाणी देण्यात आले. यावरून पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत असल्याने बंधारा गरजेचा आहे.
 

Web Title: The usefulness of the schemes due to lack of water is zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.