Wardha news आर्वीच्या वैशाली हिवसे बनल्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 12:47 PM2021-04-30T12:47:17+5:302021-04-30T12:47:38+5:30

Wardha news आर्वीतील  वैशाली सुरेशचंद्र  हिवसे  यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या कंपनीने  कमांडिंग ऑफिसर पदी नियुक्ती केली आहे,  पहिल्या महिला अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्याचेच नव्हे तर विदर्भाचे नाव मोठ केले आहे.

Vaishali Hivase of Arvi became the first woman commanding officer of the Border Road Organization | Wardha news आर्वीच्या वैशाली हिवसे बनल्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर

Wardha news आर्वीच्या वैशाली हिवसे बनल्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर

googlenewsNext

राजेश सोळंकी

 लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा: आर्वीतील  वैशाली सुरेशचंद्र  हिवसे  यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या कंपनीने  कमांडिंग ऑफिसर पदी नियुक्ती केली आहे,  पहिल्या महिला अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्याचेच नव्हे तर विदर्भाचे नाव मोठ केले आहे.

रोड कंट्रक्शन कंपनीने (आरसीसी) इंडिया चीन बॉर्डर कनेक्टिव्हिटीची जबाबदारी महिला  सशक्तीकरण म्हणून  आर्वीच्या वैशाली हिवसे यांना दिली असल्याने आर्वीची (वर्धा )कन्या म्हणून विदर्भात गर्वाची आणि अभिमानाची ही  बाब आहे
 वैशाली यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण येथील मॉडेल हायस्कूलमध्ये झाले होते त्यानंतर येथील नगरपालिका कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर सेवाग्राम बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी नागपुरला  रामदेव बाबा कॉलेजमध्ये एम टेक पूर्ण करून  यूपीएससीची परीक्षा दिली. त्यानंतर बॉर्डर ऑर्गनायझेशनमध्ये त्यांचे सिलेक्शन झाले. हे बीआरओ आर्मीसोबत सलग्न आहे डिफेन्सच्या अंडरमध्ये आहे. चीन चायना बॉर्डर सध्याचे बांधकाम चालू आहे त्यांचा पूर्ण कार्यभार व त्यांची देखरेख वैशालीकडे आहे डिफेन्स आणि आर्मीशी निगडीत दहा वर्षापासून त्या कार्यरत आहे
त्यांच्या आई या येथील मॉडेल हायस्कुल वाथोडा येथे मुख्याध्यापिका होत्या तर त्यांचे वडील येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात शारीरिक शिक्षक होते.  वैशाली यांचा  मोठा भाऊ डॉ सचिन हिवसे  आर्वीला बाल रोग तज्ञ  आहे त्याची लहान बहीण नागपूरला हायकोर्टात वकील आहे.

वैशाली हिवसे  सिविल कार्यकारी अभियंता आहे  त्यांनी कारगिल येथे दहा वर्ष  आव्हानात्मक परिस्थितीत कार्य केले आहे सोबतच दहा हजार फूट उंच पहाडीवर  वळण रस्ते  बोगदे  आणि  रस्तेचे संलग्निकरणांचे करण्याचे  कार्य करून ते बॉर्डर रोड ऑर्गनिझेशनने  पूर्णत्वास नेले आहे.
 मागील वर्षी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन च्या वतीने बोगदा आंतरिक मार्ग ची निर्मिती केली.

 covid-19 च्या काळामध्ये महामारी सुरू असताना चायना बॉर्डर च्या रोडचे  काम ब्रो ने केले. ही बॉर्डर भारत चीन लागून लद्दाख सेंटरमध्ये आहे. सध्या लद्दाख जम्मू-काश्मीर उत्तरांखंड हिमालय प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या प्रांतात ब्रोचे  नियोजित मार्गाचे काम सुरू आहे.  तसेच 61 रस्त्याचे सुनियोजित कामाचे चायना बॉर्डरवरील हे कार्य डिसेंबर 2022 मध्ये ब्रो पूर्ण करणार आहे ,त्यासाठी सर्व सोयी सुविधा यंत्रसामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.
 अशा कठीण कामात महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी महिलांना पुढाकार देण्याचे कार्य बीआरओ करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे .
 आधुनिक परिस्थितीत महिला सशक्तीकरणसाठी ब्रो ने पाऊले उचलली असून महिला अधिकारी  चांगल्या तऱ्हेने हे आव्हानात्मक कार्य पूर्ण करू शकतात,  म्हणून महिलांना जबाबदारी देण्यात आल्याचा असा विश्वास व्यक्त केला असून ब्रो ने  ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

Web Title: Vaishali Hivase of Arvi became the first woman commanding officer of the Border Road Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार