Vardha: क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांची पोलिसांनी उडविली दांडी, सहा आरोपींना अटक, दोन कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त

By आनंद इंगोले | Published: April 12, 2023 06:47 PM2023-04-12T18:47:13+5:302023-04-12T18:47:50+5:30

Crime News: दिल्ली येथील आयपीएल क्रि केट सुरु असून यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात असल्याची माहिती वर्ध्यातील क्राईम इंटेलिजन्स पथक व सायबर सेलला मिळाली. या माहितीच्या आधारे वर्धा आणि टाकळघाट या ठिकाणी धाड टाकून सहा जुगा-यांची दांडी उडविली.

Vardha: Cricket betting players busted by police, six accused arrested, two cars seized with valuables worth 49 lakhs | Vardha: क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांची पोलिसांनी उडविली दांडी, सहा आरोपींना अटक, दोन कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Vardha: क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांची पोलिसांनी उडविली दांडी, सहा आरोपींना अटक, दोन कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

- आनंद इंगोले
वर्धा - दिल्ली येथील आयपीएल क्रि केट सुरु असून यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात असल्याची माहिती वर्ध्यातील क्राईम इंटेलिजन्स पथक व सायबर सेलला मिळाली. या माहितीच्या आधारे वर्धा आणि टाकळघाट या ठिकाणी धाड टाकून सहा जुगा-यांची दांडी उडविली. त्यांच्याकडून दोन कारसह मोबाईल आणि इतर वस्तू असा एकूण ४९ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गणेश राठी रा. भामटीपुरा, सलमान रज्जाक मेमन (२७) रा. शास्त्री चौक, जितेंद्र रंजित तिवारी (३४) रा. रामनगर सिंदीनाका, माधव इश्वरदास नानवाणी (३४) रा. दयालनगर, मुकेश अनिल मिश्रा (३३) रा. परदेशीपुरा, रिकेश मनोज तिवारी (२७) रा. वैद्य ले आऊट असे अटक करणाºया आलेल्या आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरातील भामटीपुरा परिसरातील गणेश राठी हा व्यक्ती अ‍ॅन्ड्राईड मोबाईलवर आयपीएल टी-२०-२० या दिल्ली विरुद्ध मुंबईच्या क्रिकेट मॅचवर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून गणेश राठी याला ताब्यात घेतले.

त्याच्या मोबाईलचा संदेश बॉक्स तपासला असता मोबाईल क्रमांक ७३८७१८८३९७ वरुन दिल्ली विरुध्द मुंबई या मॅचच्या १० ओव्हरमध्ये ७० रन होतील असे २ हजार रुपयांचा जुगार लावला होता. हा मोबाईल क्रमांक सलमान रज्जाक मेमन याचा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तो मोबाईल क्रमांक बुट्टीबोरी लगतच्या टाकळघाट येथे असल्याने तांत्रिक माहितीवरुन पुढे आले. त्यामुळे पोलिस पथक आणि पंच टाकळघाटमध्ये पोहचले. तेथील लिंक बिल्डींगच्या तिसºया माळ्यावरील फ्लॅट क्रमांक १० मध्ये धडक दिली. तेथे पाचही आरोपी सट्टा घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या पाचही आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ४० मोबाईल, ३ लॅपटॉप, ४ माईक, २ मोबाईल रिसिव्हर आणि दोन कार, असा एकूण ४९ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांच्या मार्गदर्शनात क्राईम इंटेलिजन्स पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, विनीत घागे याच्यासह निलेश कट्टोजवार, रोशन निंबोलकर, दिनेश बोथकर, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, सागर भोसले, अंकित जिभे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, गोविंद मुंडे, धिरज राठोड, राकेश इतवारे, पवन देशमुख, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, प्रफुल वानखेडे यांनी केली.

सहा वर्षातील पहिली कारवाई: नुरुल हसन
वर्ध्यातील भामडीपुरा परिसरात एक व्यक्ती आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावत असल्याची माहिती ११ एप्रिलला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गणेश राठी याला ताब्यात घेत मोबाईल तपासला असता पुढील धागेदोरे गवसले. हे फार मोठे रॅकेट असल्याचे पुढे आल्याने तांत्रिक माहितीच्या आधारे टाकळघाट येथून पाच आरोपींना अटक करण्यात आली. या जुगारामध्ये वर्धा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यातीलही जुगाºयांचा सहभाग असून त्यांचाही तपास सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. हे जुगारी एकापेक्षा जास्त दुसºयाच्या नावाचे सिमकार्ड वापरुन क्रिकेटचा जुगार खेळत होते. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवून ते लोकांची फसवणूक करीत होते. त्यामुळे विविध कलमान्वये सहा आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ४९ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या सहा वर्षाच्या काळामध्ये जुगाराप्रकरणी ही पहिलीच मोठी कारवाई आहे, असे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
वर्ध्यातील गणेश राठी या एका आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर शहरातीलच परंतु टाकळघाट येथे क्रिकेट सट्टा चालविणाºया सलमान रज्जाक मेमन, जितेंद्र रंजित तिवारी, माधव इश्वरदास नानवाणी, मुकेश अनिल मिश्रा व रिकेश मनोज तिवारी या पाच आरोपींना अटक केली. सर्वांना आज न्यायालयात हजर केले असता सहाही आरोपींना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे यात आणखी काही बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.

Web Title: Vardha: Cricket betting players busted by police, six accused arrested, two cars seized with valuables worth 49 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.