रुग्णालय परिसरात बिबट्या आढळल्याने खळबळ; वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 12:11 PM2021-10-25T12:11:38+5:302021-10-25T12:12:57+5:30
रुग्णालय प्रशासनाने सतर्कता बाळगत रुग्णालयाचे दरवाजे आणि खिडक्या बंद करत वनविभागासह पोलिसांना माहिती दिली.
वर्धेच्या सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय परिसरात बिबट्या आढळल्याने खळबळ माजलीय.सकाळदरम्यान हा बिबट्या रुग्णालयाच्या छतावर कर्मचाऱ्याला दिसला.बिबट्या दिसताच रुग्णालय परिसरात खळबळ माजलीय. रुग्णालय प्रशासनाने सतर्कता बाळगत रुग्णालयाचे दरवाजे आणि खिडक्या बंद करत वनविभागासह पोलिसांना माहिती दिली.
वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येताच हा बिबट्या झाडावर बसला असल्याचे आढळले.काही वेळेतच कर्मचाऱ्यांनी त्याला हुसकावून लावले.मात्र तो या परिसरतीलच नालीत शिरला.मागील अर्धा तासापासून वनविभागचे कर्मचारी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करत आहे तर रस्त्यालगत असलेल्या नालीतच त्याने आडोसा घेतल्याने रुग्णालय समोरचा मुख्य मार्ग बंद करण्यात आला आहे.