शिक्षक मतदार संघाकरिता वर्धेत ६२ टक्के मतदान
By admin | Published: February 4, 2017 12:20 AM2017-02-04T00:20:01+5:302017-02-04T00:20:01+5:30
विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले.
१४ मतदान केंद्रावर झाले मतदान
वर्धा: विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. निवडणुकीसाठी वर्धा जिल्ह्यात ४ हजार २७९ मतदार आहेत. यापैकी २ हजार ९४८ पुरूष व १ हजार ३३१ महिला मतदार आहेत. जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. आज झालेल्या मतदानामध्ये सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २ हजार ६५३ मतदारांनी मतदान केले. वर्धा येथील एक मतदान केंद्र वगळता सरासरी अंदाजे ६२ टक्के मतदान झाले.
या निवडणुकीत एकूण १६ उमेदवार रिंगणात असून मतदारांची संख्या ३५ हजार ९ इतकी आहे. यापैकी २३ हजार ८३८ पुरूष व ११ हजार १७१ महिला मतदार आहे. नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा अशा एकूण ६ जिल्ह्यात १२४ मतदार केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेकरिता ६८० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. येत्या सोमवारी रोजी नागपूर येथील सेंट उर्सुला शाळेत मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.(प्रतिनिधी)