वरुणराजा विसरला वर्ध्याची वाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:34 PM2019-06-16T23:34:33+5:302019-06-16T23:35:08+5:30

यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात वर्ध्याचा पारा ४७.९ पर्यंत चढला होता. त्यामुळे वेळीच मान्सून दाखल होऊन दमदार पाऊस जिल्ह्यात होईल, असा कयास अनेकांकडून बांधला जात होता. मात्र, जून महिन्याचे पंधरा दिवस लोटूनही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी न लावल्याने वरुणराजा वर्ध्याची वाट तर विसरला नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये होत आहे.

Varunaraja forgot the Wardha watt? | वरुणराजा विसरला वर्ध्याची वाट?

वरुणराजा विसरला वर्ध्याची वाट?

Next
ठळक मुद्देपंधरवड्यात केवळ ७४.९७ मि.मी. पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात वर्ध्याचा पारा ४७.९ पर्यंत चढला होता. त्यामुळे वेळीच मान्सून दाखल होऊन दमदार पाऊस जिल्ह्यात होईल, असा कयास अनेकांकडून बांधला जात होता. मात्र, जून महिन्याचे पंधरा दिवस लोटूनही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी न लावल्याने वरुणराजा वर्ध्याची वाट तर विसरला नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये होत आहे. मागील १५ दिवसांत जिल्ह्यात केवळ ७४.९७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वेळीच पाऊस न आल्यास याचा फटका शेतकऱ्यांसह नागरिकांनाही सहन करावा लागणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात ८८९.४० मिमी, सेलू तालुक्यात ९५९.६२ मिमी, देवळी तालुक्यात ९५९.६२ मिमी, हिंगणघाट तालुक्यात ९७५.७० मिमी, समुद्रपूर १००१.६२ मिमी, आर्वी तालुक्यात ८५०.३० मिमी, आष्टी तालुक्यात ८६४.७२ मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ८६४.७२ मिमी पाऊस पडतो. तशी नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. परंतु, १ ते १५ जून या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात केवळ ७४.९७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, जून महिन्यात वर्धा तालुक्यात १६३.८० मि. मी. सेलू १८३.९० मिमी, देवळी तालुक्यात १८३.९० मिमी, हिंगणघाट तालुक्यात १५८.६० मिमी, समुद्रपूर १८३.५० मिमी, आर्वी तालुक्यात १५४.१० मिमी, आष्टी तालुक्यात १७१.७० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात १७१.७० मिमी पाऊस पडतो; पण मागील काही दिवसात वादळीवाऱ्यासह नाममात्र झालेल्या पावसाने अनेकांच्या अडचणीत भरच टाकली. असे असले तरी पेरणीची कामे खोळंबली असल्याने शेतकऱ्यांना तर भीषण पाणी समस्येला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
६० टक्के आटोपली कपाशीची लागवड
अल्लीपूर : परिसरात कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून ग्रामीण भागातील शिरूड, सिरसगाव, पवनी, अलमडोह, टाकळी दरणे, येरणवाडी, पिंपळगाव भागात कपाशी व तूर लागवड जवळपास ६० टक्के पूर्ण झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस आल्यावरच लागवडीचा निर्णय घेतला आहे. रोहणी नक्षत्रात दमदार पाऊस न पडल्याने वाही न करताच शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर करून जमीन तयार केली. शिवाय, लागवड केली. काही भागात तुरळक पाणी झाल्याने कपासी लागवड वाया गेल्या आहे. मृग नक्षत्राला सुरुवात होऊन आठवडा होत आहे; मात्र पाऊसच रूसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मागीलवर्षी यावेळी डवरणी, खुरपणीच्या कामाला गती दिली जात होती. तर यंदा विपरित चित्र पाहायला मिळत आहे.

Web Title: Varunaraja forgot the Wardha watt?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस