उड्डाण पूल रखडल्याने वाहनांच्या रांगा

By admin | Published: May 31, 2015 01:37 AM2015-05-31T01:37:57+5:302015-05-31T01:37:57+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील रेल्वे फाटकाजवळ वाहतूक तासनतास खोळंबत असल्याने येथे उड्डाणपुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव मंजूर केला.

Vehicle Range due to the holding of the flight bridge | उड्डाण पूल रखडल्याने वाहनांच्या रांगा

उड्डाण पूल रखडल्याने वाहनांच्या रांगा

Next

रेल्वे फाटक ठरतेय डोकेदुखी : राष्ट्रीय महार्गावर होतोय वाहतुकीचा पचका
हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील रेल्वे फाटकाजवळ वाहतूक तासनतास खोळंबत असल्याने येथे उड्डाणपुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव मंजूर केला. मात्र या उड्डाणपुलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. परिणामी या मार्गावर वाहनांच्या रांगा लागतात. राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांसह प्रवासी वाहतूक अधिक प्रमाणात होत असते. यातच येथील रेल्वे फाटक बंद राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा हा प्रकार नित्याचाच झाला आहे.
या उड्डाणपुलापूर्वी मंजूर झालेल्या अन्य पुलांचे बांधकाम पूर्ण झाले असताना याच पुलाचे बांधकाम कासवगीतने सुरू असल्याने याबाबत संताप व्यक्त होत आहे. या मार्गावर रेल्वे गेट आहे. उत्तर व दक्षिण दिशांना जोडणारी रेल्वे वाहतूक या मार्गाने होत असल्याने बंद राहत असल्याने दररोज येथे वाहनाच्या रांगा लागतात. शिवाय ही बाब अपघाताचे कारण ठरत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.
शहरातून प्रमुख राष्ट्रीय व राज्य मार्ग जातात. यामुळे रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलास प्राध्यानाने मंजुरी देण्यात आली होती. यामुळे या पुलाचे काम तातडीने पूर्ण होवून शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तसे झालेले नाही.
रेल्वे फाटकाजवळील उड्डाणपुलाचे काम अद्यापही रखडलेले असल्याने वाहतुकीच्या होणारा खोळंबा हा प्रकार येथे नित्याचाच झाला आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. जड वाहनांच्या लांबच रांगा लागतात. यामुळे येथे वाहतूकीचा पचका असतो. वाहन धारकांना तासनतास ताटकळत राहावे लागते. उड्डाणपुलाचे बांधकाम अत्यंत संथगतीने सुरू आहे. यामुळे ही बाब वाहतूकीस अडथळा निर्माण करीत आहे. शिवाय या भागात अपघातात वाढ झाल्याचे दिसते. सदर उड्डाणपुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश रेल्वे विभागाला द्यावे, अशी मागणी येथील सामाजिक संघटनांनी केली आहे.
महामार्गावरील वाहतूक खोळंबत असल्याने दुरवरुन येणाऱ्या वाहनांना येथे नाहक थांबावे लागत आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम दोन्ही बाजूने सुरू असल्याने आवागमनास रस्ता अरुंद ठरतो. यामुळे वाहतुकीच्या समस्येत अधिकच भर पडत आहे. यामुळे रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. यापूर्वी येथे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. उड्डाणपुलाच्या बांधकामाला गती देवून बांधकाम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. येथेच मालवाहू रेल्वे डब्याचे शंटींगही केली जात असून याकरिता वाहतूक थांबविल्या जाते. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)
पुलाचे बांधकाम संथगतीने असल्याने वाहतूक रेल्वे फाटकाकडूनच
रेल्वे फाटक क्र. १४ येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या रखडलेल्या कामामुळे वाहतूकीचे तीनतेरा वाजले आहे.
या पुलाचे बांधकाम त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश रेल्वे विभागाला द्यावे अशी मागणी नागरिकांनी वारंवार निवेदनातून केली आहे. या ससस्येकरिता खासदार तडस यांना साकडे घालण्यात आले आहे.
उड्डाण पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर करावे अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबीत आहे. बांधकाम पूर्ण होण्याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष
‘मध्य रेल्वे’ अंतर्गत येत असलेल्या या रेल्वे मार्गाने दक्षीण ते उत्तरकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची सातत्याने वर्दळ सुरू असते. त्यामुळे रेल्वेफाटक दिवसांतून अर्धा तासाच्या अंतराने बंद केले जाते.
दुचाकी वाहने रेल्वे फाटकाचा अडथळाला पार करून पुढे जाताना दिसतात. यात मोठी व जड वाहने अडकुन पडतात. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागातात.
फाटक उघडताच वाहनांमध्ये पुढे जाण्यासाठी स्पर्धा दिसून येते. यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे.
बांधकामामुळे रस्ता पडतो अरुंद
उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असल्याने बांधकामाचे साहित्य या भागात टाकण्यात आले. यामुळे आवागमनाचा रस्ताही अरुंद झाला आहे. ही बाब वाहतुकीकरिता अडचणीची ठरत आहे. यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
ज्या भागात बांधकाम सुरू आहे. तेथील रस्त्याचे काही दिवसांपूर्वी बांधकाम केले होते. मात्र यामुळे या रस्त्याचीही दुरावस्था झाली असून रस्ता उखडलेला आहे.
पादचारी, सायकलस्वार रेल्वे फाटक बंद असल्यानंतरही ये-जा करतात. यामुळे अपघाताचा धोका संभवतो. येथील रेल्वे फाटकापासून होणारी वाहतूक डोकेदुखी ठरत आहे.
मध्य रेल्वेच्या उत्तर-दक्षिण मार्गावर असलेल्या हिंगणघाट रेल्वे स्थानकात गाड्यांचा थांबा असतो. यामुळे दिवसभरात अनेकदा फाटक बंद होते. परिणामी वाहतूक रस्ता वाजतूक प्रभावित होते.
शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र.७, नागपूर ते चंद्रपूर मार्ग यासह ग्रामीण भागात जाणारे रस्ते जोडले असल्याने वाहनांची वर्दळ असते. यात टँकर व ट्रेलर यासारख्या जडवाहनांची संख्या मोठी आहे. बसेस, खाजगी वाहनांची वाढती संख्या पाहता पुलाचे बांधकाम अगत्याने करणे गरजेचे ठरत आहे.

Web Title: Vehicle Range due to the holding of the flight bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.