वर्धा जिल्ह्यातील १६ बॉर्डर सील पॉइंटवर वाहने होते सेनेट्राइज; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 03:34 PM2020-04-12T15:34:24+5:302020-04-12T15:34:42+5:30
वर्धा जिल्ह्यातील १६ बॉर्डर सील पॉइंटवर विशेष प्रणाली लावण्यात आली आहे. या द्वारे जीवनावश्यक वस्तू घेऊन वर्धा जिल्ह्यात येणारे प्रत्येक वाहन सेनेट्राइज केले जात आहे.
वर्धा : वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा रुग्ण आढळला नसून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्याच्या सिमा सील करण्यात आल्या आहेत. शिवाय इतर जिल्ह्यातून भाजीपाला आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
कोरोनाचा विषाणु वर्धा जिल्ह्यात शिरु नये म्हणुन वर्धा जिल्ह्यातील १६ बॉर्डर सील पॉइंटवर विशेष प्रणाली लावण्यात आली आहे. या द्वारे जीवनावश्यक वस्तू घेऊन वर्धा जिल्ह्यात येणारे प्रत्येक वाहन सेनेट्राइज केले जात आहे. याच प्रणालीची आज जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी वर्धा-नागपूर मार्गावरिल सेलडोह येथे बॉर्डर सील पॉइंटची पाहणी केली.
या प्रसंगी उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, सहायक उपप्रादेशिक अधिकारी विजय तिराणकर, तहसीलदार महेंद्र सोनोने, नायब तहसीलदार दिगलमवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.