अन् विक्रेत्याने फेकली पोलिसांच्या अंगावर दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:01 AM2017-09-17T00:01:13+5:302017-09-17T00:01:24+5:30
दारूविक्रत्यांच्या घरावर धाड मारून कारवाई करणाºया पोलीस कर्मचाºयांच्या अंगावर दारू फेकल्याचा प्रकार गुरुवारी रात्री सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मांडवगड येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दारूविक्रत्यांच्या घरावर धाड मारून कारवाई करणाºया पोलीस कर्मचाºयांच्या अंगावर दारू फेकल्याचा प्रकार गुरुवारी रात्री सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मांडवगड येथे घडली. या दारू विक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपींची नावे भीमराव येसनकर आणि नितीन भीमराव येसनकर अशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू विकल्या जात आहे. शहरालगतच्या गावखेड्यात गावठी दारू विक्रीचा पूर आला आहे. सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मांडवगड येथे दारूचे पाट वाहत असल्याची ओरड आहे. या विक्रीला येथील पोलीस कर्मचाºयांचेच पाठबळ असल्याचे गावकºयांकडून सांगण्यात येत आहे. येथील काही दारू विक्रेत्यांवर कधीच कारवाई होत नसल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले आहे. या दारूविक्रीला आळा घालण्याकरिता गुरुवारी रात्री विजय उमरे आणि प्रमोद शेळके नामक पोलीस कर्मचारी कारवाई करण्याकरिता गेले. त्यांनी गावात माहिती घेतली असता खबºयाकडून येथील भीमराव येसनकर याच्या घरी मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन येसनकरच्या घरावर धाड घातली असता भीमराव व त्यांचा मुलगा नितीन येसनकर याने पोलिसांच्या अंगावर दारू फेकून पळ काढला. या प्रकरणी विजय उमरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून भीमराव आणि नितीन येसनकर या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. असे नेहमीच घडत असल्याने यात नेमका दोष कोणाचा याचा शोध गरजेचा आहे.
दारूबंदीच्या कायद्यात अनेक बदल, तरीही विक्री सुरूच
दारूबंदी कडक करण्याकरिता काही कायद्यात बदल करण्यात आले आहे. त्या कायद्यानुसार जिल्ह्यात कारवाई सुरू करण्यात आली आहे. दारूबंदी करणाºयांना तडीपार करण्याचे अनेक प्रकरणे आहेत. नव्या अनेक प्रकरणात अनेकांवर या कायद्यानुसार कारवाईचे अनेक प्रस्ताव तयार आहेत. तरीही जिल्ह्यात दारू विक्री सुरूच आहे.
कारवाईदरम्यान पैशाची मागणी ?
दारूविक्रेत्याच्या घरी गेलेले पोलीस कर्मचारी विक्रेत्याला पैसे मागत असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणातही तसे झाले असावे अशी चर्चा गावात आहे. यामुळेच दारू विक्रेत्याने हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे.