श्रद्धेय अटलजी अमर रहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 09:36 PM2018-08-23T21:36:55+5:302018-08-23T21:39:07+5:30

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी जिल्ह्यात दर्शनासाठी आणण्यात आला. नागपुरातील विमानतळावरुन वाहनातून निघालेला हा अस्थिकलश सेलडोह, केळझर, सेलू व पवनार मार्गे वर्ध्यात पोहचला.

Venerable Atalji remains immortal ... | श्रद्धेय अटलजी अमर रहे...

श्रद्धेय अटलजी अमर रहे...

Next
ठळक मुद्देअनेकांनी घेतले अस्थिकलशाचे दर्शन : भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांची उसळली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी जिल्ह्यात दर्शनासाठी आणण्यात आला. नागपुरातील विमानतळावरुन वाहनातून निघालेला हा अस्थिकलश सेलडोह, केळझर, सेलू व पवनार मार्गे वर्ध्यात पोहचला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दर्शन घेऊन अटलजी अमर रहे...च्या घोषणा दिल्या. त्यानंतर हिंगणघाट मार्गे चंद्रपूकडे रवाना झाला.
खा. रामदास तडस, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, आ. डॉ. पंकज भोयर, आ. रामदास आंबटकर, नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.शिरीष गोडे, सुनिल गफाट, अविनाश देव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी नागपूरच्या विमानतळावरुन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश स्विकारला. तेथून सजवलेल्या वाहनात हा अस्थिकलश वर्ध्याकडे रवाना झाला. सेलडोह, केळझर व सेलू येथे भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर पवनार मार्गे वर्ध्यात दाखल झाला. सुरुवातीला नालवाडी चौकात अस्थिकलश थांबवून तेथून वर्ध्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तो धुनिवालेमठ चौक, शिवाजी चौक, आर्वी नाकामार्गे धंतोली चौकातील भाजपा जिल्हा कार्यालयात आणण्यात आला. तेथे अस्थिकलशाचे दर्शन अनेकांनी घेतले. येथे सामुहीक श्रध्दांजलीही अर्पण करण्यात आली. त्यानंतर हा अस्थिकलश सोशालिस्टचौक, बोरगांव, वायगाव येथून हिंगणघाटकडे रवाना झाला. हिंगणघाटच्या जाम चौकात या कलशाचे अनेकांनी दर्शन घेतले. यावेळी आ. समीर कुणावार, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, खा. रामदास तडस, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, सुनील गफाट यांनी हा कलश चंद्रपूर जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा व माजी मंत्री संजय देवतळे यांच्यासह पदाधिकाºयांना सोपविला. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपाचे जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, नगरपंचायत व न.प.सदस्य तसेच ग्रा.पं. सदस्यांसह आणि नागरिक हजर होते.

Web Title: Venerable Atalji remains immortal ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.