उभ्या ट्रकला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:28 PM2018-08-03T22:28:37+5:302018-08-03T22:29:10+5:30

नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील संतराम हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. यात वाहनातील चालक व क्लिनर थोडक्यात बचावला असून ट्रकचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे.

Vertical triangle fire | उभ्या ट्रकला लागली आग

उभ्या ट्रकला लागली आग

Next
ठळक मुद्देजाम येथील घटना : वाहनाचे नुकसान; आग विझविताना एक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील संतराम हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. यात वाहनातील चालक व क्लिनर थोडक्यात बचावला असून ट्रकचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूरकडून नागपूरकडे जाणारा यु.पी. ५३ सी.टी. ०८४६ क्रमांकाचा ट्रक संतराम हॉटेल समोर उभा होता. ट्रकचा चालक विक्की कोमल शर्मा (४२) रा. नगबा. जि. गोरखपूर व क्लिनर हे दोघे ट्रकखाली उतरून जेवन तयार करीत होते. दरम्यान ट्रकने अचानक पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करून ट्रकच्या कॅबीन मधील साहित्याला आपल्या कवेत घेतले. ट्रकने पेट घेतल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आग विझविण्याच्या प्रयत्नात एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक भारत कºहाडे, समुद्रपूरचे ठाणेदार प्रवीण मुंडे आदींनी घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. शिवाय खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या घटनेची समुद्रपूर पोलिसांनी नोंद घेतली आहे.
नेहमीप्रमाणे हिंगणघाटहून अग्निशमन बंब पोहोचला उशिराने
परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देत हिंगणघाटच्या अग्निशमन विभागाला दिली. परंतु, आग विझविण्यात आल्यावर अग्निशमन बंब पोहोचल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते.

Web Title: Vertical triangle fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग