आष्टीत पंतप्रधानांपासून दिग्गजांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 09:27 PM2019-08-04T21:27:31+5:302019-08-04T21:28:31+5:30

इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेल्या आष्टीच्या क्रांतिलढ्याला नागपंचमीच्या दिवसाची किनार लाभली आहे. यंदा त्याला ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळेच्या प्रसंगाला आष्टीकरांनी जिवंत आणि ज्वलंत ठेवून राष्ट्रभक्तीच्या कार्याला सलामच केला आहे. देशाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्यापासून २६५ दिग्गजांनी आष्टी गाठून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Veterans pay homage to the martyrs from the Prime Minister | आष्टीत पंतप्रधानांपासून दिग्गजांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली

आष्टीत पंतप्रधानांपासून दिग्गजांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली

Next
ठळक मुद्देदिनविशेष : क्रांतिलढ्याला नागपंचमीदिनाची किनार; यंदा ७७ वर्षे होताहेत पूर्ण

अमोल सोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेल्या आष्टीच्या क्रांतिलढ्याला नागपंचमीच्या दिवसाची किनार लाभली आहे. यंदा त्याला ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळेच्या प्रसंगाला आष्टीकरांनी जिवंत आणि ज्वलंत ठेवून राष्ट्रभक्तीच्या कार्याला सलामच केला आहे. देशाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्यापासून २६५ दिग्गजांनी आष्टी गाठून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
१६ आॅगस्ट १९४२ रविवार आणि तोही नागपंचमीचा दिवस, तालुक्यातील डॉ. गोविंद मालपे, रामभाऊ लोहे, पंछी गोंड, केशव ढोंगे, उदेभान कुबडे, नबाब राशीदखान हे क्रांतीवीर शहीद झाले. ब्रिटीश सरकार उकंड्या ही केस लंडनच्या प्रिव्ही कौन्सिलमध्ये चालली. एवढा मोठा आष्टीचा इतिहास, नागपंचमीदिनी या दिवशी शहीद झालेल्या वीरांना देशाची मान्यवर मंडळी श्रद्धांजली अर्पण करतात. आष्टीसह विविध गावातील शहीदांचे वारस जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर कार्यरत आहेत. या दिवशी ही मंडळी आष्टीला येऊन नतमस्तक होतात. १९८४ साली आष्टी (शहीद) तालुक्याची निर्मिती झाली. तालुका निर्मितीसाठीही आंदोलन करावे लागले होते. श्रीधरराव ठाकरे यांच्या पुढाकाराने तालुका झाला आणि विकासही झाला. आष्टीला जलशुद्धीकरण केंद्रासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी मदत करून पायाभरणी केली. आजही त्याच ठिकाणाहून पाणीपुरवठा सुरू आहे. आष्टी तालुका झाला; पण शासनदरबारी आष्टी (शहीद) अशी नोंद नाही. त्यासाठी कुणीही लक्ष दिल्याचे दिसत नाही. लोकप्रतिनिधींनी आष्टी (शहीद) नामकरण करावे, अशी येथील जनतेची मागणी आहे.
नागपंचमीच्या दिवशी ब्रिटिश साम्राज्याला खिंडार पाडून भारत मातेचे रक्षण करणाऱ्या या विरांच्या बलिदानाचे रक्षण आजही सुरूच आहे. यावर्षी ७७ वर्ष पूर्ण झाले. राष्ट्रभक्तीचा ओघ ओसांडून वाहत आहे.
स्वातंत्र्यलढ्याचे स्थळ राष्ट्रीय स्मारक व्हावे
स्वातंत्र्यलढा झाला ते स्थळ जुने पोलीस ठाणे व सद्याचे हुतात्मा राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय आहे. या स्थळाला राष्टÑीय स्मारकाचा दर्जा देण्यात यावा. शासनाने पूर्ण विकास करावा, अशी मागणी आष्टीवासी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. मात्र शासनाने सदर मागणी अद्यापही पुर्ण केली नाही. त्यामुळे सदर स्थळ उपेक्षीत आहे.
गडकरींकडून आष्टीकरांना या आहेत अपेक्षा
आष्टीकरांना नेहमी भरभरून प्रेम देणारे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत आहेत. याबाबत स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या परिवाराला विचारणा केली असता ‘आष्टीला आष्टी (शहीद) असे नामकरण करून द्यावे. शहराची अप्पर वर्धा धरणामधून १४ कोटी रूपयाची प्रलंबीत पाणीपुरवठा योजना मंजूर करून द्यावी. क्रांतीलढ्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देवून विकास करण्यासाठी २५ कोटींची मदत द्यावी’ असे सांगितले.
७७ वर्षांत २६५ दिग्गज नतमस्तक
दरवर्षी शहीद स्मृतीदिनी (नागपंचमी) शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशातील दिग्गज मंडळी आष्टी येथे येतात. यामध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, असंख्य केंद्रीय मंत्री, राज्य स्तरावरील मंत्री, आमदार, खासदार, कवी, लेखक, लोकप्रिय व्यक्तींचा समावेश आहे.

Web Title: Veterans pay homage to the martyrs from the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.