पोलिसांसमोर पीडितेने सांगितले आरोपीचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 06:00 AM2020-02-12T06:00:00+5:302020-02-12T06:00:15+5:30

सोमवारी तणावपूर्ण शांततेत जळीत प्रकरणातील पीडित प्राध्यापिकेवर हिंगणघाट तालुक्यातील तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या अंत्यसंस्कारानंतरही गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त कायम होता. तर मंगळवारी पीडितेच्या काही नातेवाईकांसह काही बड्या लोकप्रतिनिधींनी पीडितेचे मूळ गाव गाठून मृतक प्राध्यापिकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

The victim told the police the name of the accused | पोलिसांसमोर पीडितेने सांगितले आरोपीचे नाव

पोलिसांसमोर पीडितेने सांगितले आरोपीचे नाव

Next
ठळक मुद्दे‘ती’ने निरोप घेतला; पण क्रूर मानसिकतेचे काय? सवाल कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वडनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी असलेल्या प्राध्यापिकेवर हिंगणघाट येथील नंदोरी चौक परिसरात सोमवार ३ फेब्रुवारीला सकाळी तिच्याच गावातील एका माथेफिरू तरुणाने पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या पीडित प्राध्यापिकेची मागील आठ दिवसांपासून मृत्यूची झुंज सुरू होती. अशातच आठव्या दिवशी तिची प्राणज्योत मालवली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून ‘ती’ गेली; पण क्रूर मानसिकतेचे काय? असा सवाल पीडितेच्या मृत्यूनंतर दुसऱ्याही दिवशी जिल्ह्यात चर्चीला जात आहे.
सोमवारी तणावपूर्ण शांततेत जळीत प्रकरणातील पीडित प्राध्यापिकेवर हिंगणघाट तालुक्यातील तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या अंत्यसंस्कारानंतरही गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त कायम होता. तर मंगळवारी पीडितेच्या काही नातेवाईकांसह काही बड्या लोकप्रतिनिधींनी पीडितेचे मूळ गाव गाठून मृतक प्राध्यापिकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सोमवार ३ फेबु्रवारीला ही घटना घडली. त्यानंतर गंभीर स्वरूपात भाजलेल्या पीडित प्राध्यापिकेची नागपूर येथील आॅरेंज सीटी हॉस्पिटलमध्ये आठ दिवस मृत्यूशी झुंज सूरू होती. याच आठ दिवसांच्या कालावधीत गंभीर जखमी पीडिता कुठलीही गोष्ट लागल्यास हातवाऱ्यांनी ती ते सांगत होती. परंतु, घटनेचा दिवस असलेल्या सोमवारी रुग्णालयात पोलिसांकडून विचारपूस केल्यावर तिने केवळ आरोपीचे नाव सांगितले होते, असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर खात्रीदायक पोलीस सूत्रांनी सांगितले.

सोमवार ठरला घातवार
हिंगणघाट तालुक्यातील एका गावात राहणारी प्राध्यापिका नेहमीप्रमाणे हिंगणघाट येथील तिच्या महाविद्यालयात जात होती. हिंगणघाटच्या नंदोरी चौकापर्यंत तिने बसचा प्रवास केला. त्यानंतर ती पायदळ जात असताना पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. तर उपचार सुरू असताना सोमवारीच सकाळी तिच्यावर काळाने झडप घातली. त्यामुळे सोमवार या पीडितेसह तिच्या कुटुंबीयांसाठी घातवारच ठरला.

Web Title: The victim told the police the name of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.