स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आता विदर्भवाद्यांचे ‘मिशन २०२३’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 01:34 PM2022-03-21T13:34:55+5:302022-03-21T13:41:02+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भनिर्मिती मिशन-२०२३ स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ एप्रिल २०२२ रोजी जंतरमंतर मैदान, नवी दिल्ली येथे संसदेवर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
चिकणी (जामनी)/वर्धा : विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी, तसेच प्रदूषण, कुपोषण संपविण्यासाठी, बेरोजगारांच्या रोजगारासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य होण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भवाद्यांनी मिशन २०२३ राबविण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भनिर्मिती मिशन-२०२३ स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ एप्रिल २०२२ रोजी जंतरमंतर मैदान, नवी दिल्ली येथे संसदेवर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात विदर्भातून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभागी हाेण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी केले आहे. यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, युवा आघाडी माजी अध्यक्ष सतीश दाणी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
या मागणीसाठी होणार आंदोलन
राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याचे कृषी जमिनीसाठी २० टक्के व अकृषक जमिनीसाठी ६० टक्के दर कमी करण्याचा शासननिर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.