देवळीत विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा

By admin | Published: March 27, 2017 01:09 AM2017-03-27T01:09:05+5:302017-03-27T01:09:05+5:30

देवळी येथील सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा व वर्धा जिल्हा कुस्तीगिर परिषदेच्यावतीने १ व २ एप्रिल रोजी....

Vidarbha Kesari Wrestling Competition in Deoli | देवळीत विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा

देवळीत विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा

Next

विदर्भ केसरीसाठी मानाचा गदा : ४५० महिला व पुुरुष कुस्तीगीर येणार
वर्धा : देवळी येथील सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा व वर्धा जिल्हा कुस्तीगिर परिषदेच्यावतीने १ व २ एप्रिल रोजी देवळी नगर परिषद शाळेच्या प्रांगणात खासदार चषक ३३ वी विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धा व विदर्भस्तरीय महिला अंजिक्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विदर्भातून ४५० महिला व पुरुष कुस्तीगिर सहभागी होणार आहे.
खासदार चषक ३३ व्या विदर्भस्तरीय कुस्ती (कुमार, महिला व पुरुष) स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक वजन गटातील पुरुष व महिला कुस्तीगिरांना प्रथम सुवर्ण, द्वितीय रौप्य व तृतीय कास्य पदक दिले जाणार आहे. विदर्भ केसरीचा बहुमान पटकाविणाऱ्या कुस्तीगिराला विदर्भ केसरीपदाचा मानाचा गदा दिला जाणार आहे. या स्पर्धा बाद पद्धतीच्या असल्याने आयोजकांद्वारे प्रत्येक वजनगटात प्रथम क्रमांकाला रोख बक्षीसांचीही व्यवस्था केली आहे.
विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या जिल्ह्यातील पुरुष व महिला विभागात दोन वेगवेगळे खासदार चषक दिले जाणार आहे, अशी माहिती विदर्भ कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. रामदास तडस, जिल्हा कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष आ.डॉ. पंकज भोयर, राष्ट्रीय महिला कुस्ती पटु, खासदार चषक विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा आयोजन समितीच्या अध्यक्ष सुनीता मेहरे-तडस यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी मदन चावरे, दीपक फुलकरी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)

निवड झालेले २५ कुस्तीगीर
कुस्ती स्पर्धेकरिता कुमार, महिला व पुरुष कुस्तीगिरांची निवड गुरूवारी करण्यात आली. यात विदर्भ केसरीकरिता कुमार १७ वर्षांखालील गटात ४२ किलो गौरव निशाने व रिषी बैसवारे, ४६ किलो कार्तिक मांडवकर व वैभव काटोळे, ५० किलो मनीष बोरकर, ५४ किलो अर्जुन भुते यांची निवड झाली. महिला गटात ४० किलो अमृता चावरे व आचल सुरकार, ४४ किलो सोनाली नारनवरे व साक्षी देशमुख, ४८ किलो किरण हरके, ५१ किलो निलीमा धोटे, ५५ किलो पूजा कोरवते, ५९ किलो शीतल पाल, ६३ किलो शीतल परचाके, ओपनमधुन शालिनी मोरे, पुरूष गटात ५३ किलो समीर वाढई व साहिल धुर्वे, ५७ कि़ आशिष लोखंडे व धम्मदिप कांबळे, ५९ कि़ अविनाश हिवरकर, ६५ कि़ सम्राट कांबळे, ७० कि़ नवनाथ भुसरना तसेच विदर्भ केसरीसाठी संभाजी भुसणार व गुंडा कराडे यांची निवड करण्यात आली आहे. सर्व पहेलवान १ व २ एप्रिल रोजी देवळी येथील कुस्ती स्पर्धा महिला अंजिक्य पद स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Web Title: Vidarbha Kesari Wrestling Competition in Deoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.