विदर्भ प्रदेश विकास परिषद विधायक कार्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:59 PM2018-09-26T23:59:09+5:302018-09-27T00:00:10+5:30
विदर्भ प्रदेश विकास परिषद ही निषेध, मोर्चे, हिंसाचार यासाठी नसून महात्मा गांधींच्या रचनात्मक आंदोलनावर वाटचाल करणारी चळवळ आहे. विघातक नव्हे तर विधायक कृतीवर विश्वास ठेवणारी आणि त्यानुसार सकारात्मक कार्य करणारी ही परिषद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भ प्रदेश विकास परिषद ही निषेध, मोर्चे, हिंसाचार यासाठी नसून महात्मा गांधींच्या रचनात्मक आंदोलनावर वाटचाल करणारी चळवळ आहे. विघातक नव्हे तर विधायक कृतीवर विश्वास ठेवणारी आणि त्यानुसार सकारात्मक कार्य करणारी ही परिषद आहे. याचे भान प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार दत्ता मेघे यांनी सावंगी येथे आयोजित वि.प्र.वि. परिषदेच्या सभेत केले.
याप्रसंगी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, सुरेश पोरेड्डीवार, प्रतापसिंह चौव्हाण, बाळ कुळकर्णी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. सभेला हरीश डिकोंडवार, गिरीधर राठी, साधना सराफ, वर्धा नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, वि.प्र.वि. परिषदेचे विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, डॉ. भगवान गोटे, चंद्रजीत भुयार, युवराज कराळे, विजय घाडगे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष विलास कांबळे, महमूद अंसारी, कृष्णा राठोड, भरत चुनारकर, विजय कोतपल्लीवार, रत्नाकर राऊत, श्रीकांत बांगडे, अशोक कलोडे, अरूणा चाफले, मनोरमा जयस्वाल, उषा पांडे, सपना तलरेजा, सुधाकर बैतुले, महेश पुरोहित, नितीन चौधरी, दामोधर राऊत, रविंद्र गोसावी, नरेंद्र पांडे, अविनाश नानोटे आदींची उपस्थिती होती.
सभेचे संचालन परिषदेचे महासचिव डॉ. राजू मिश्रा यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांनी मानले. सभेला जिल्हा कार्यकारिणी सदस्यांसह आदींची उपस्थिती होती.