विदर्भ राज्य आंदोलन समितीने ठिय्या देत वीजबिलांची केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:25 PM2019-08-02T23:25:18+5:302019-08-02T23:25:52+5:30

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या देत वीज बिलांची होळी केली. यावेळी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

Vidarbha State Movement Committee made electricity bills | विदर्भ राज्य आंदोलन समितीने ठिय्या देत वीजबिलांची केली होळी

विदर्भ राज्य आंदोलन समितीने ठिय्या देत वीजबिलांची केली होळी

Next
ठळक मुद्देवीजदर निम्मे करण्याची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदन; क्रांतिदिनी ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानापुढे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या देत वीज बिलांची होळी केली. यावेळी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
विदर्भातील शहरी, ग्रामीण, शेतकरी, व्यापारी, उद्योजक ग्राहकांच्या विजबिलाची रक्कम निम्मी करा, शेतकरी वर्षातून सरासरी १०० दिवस विजेचा वापर करतो, त्यापोटी केंद्र सरकारकडून राज्य शासनाला अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांची कृषिपंपाच्या वीज बिलातून मुक्ती करावी, विदर्भात दररोज ६,३०० मेगावॅट वीजनिर्मिती होते आणि वापर केवळ २२०० मेगावॅट आहे. वीज उत्पादनात जमीन, कोळसा, पाणी, वापर विदर्भातील होत असून प्रदूषणाचा मात्र नागरिकांना सामना करावा लागतो. कृषिपंपाचे १२ ते १६ तासांचे लोडशेडिंग तातडीने बंद करावे, विदर्भातील १० जिल्ह्यांतील २ लाख ४६ हजार शेतकºयांनी डिमांड रक्कम भरली आहे, पण मागील २ वर्षांपासून वीजजोडणी देण्यात आले नाही, त्यांना तातडीने जोडणी देण्यात यावी, देशातील इतर राज्यात वीज स्वस्त असून सर्वांत महागडी वीज महाराष्ट्रात आहे. ज्या दिल्ली राज्यात वीजनिर्मिती होत नाही, तिथे सर्वांत स्वस्त विज आहे. दिल्ली राज्याचे दर विदर्भात लागू करावे, औष्णिक वीज प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करावे, नागपुरातील वीजग्राहकांची लूट करणारी कंपनी तातडीने बरखास्त करावी, स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची कार्यवाही तातडीने सुरू करावी, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
जिल्हा समन्वयक मधुसूदन हरणे, तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष विद्या गिरी, तालुकाध्यक्ष अभिजित लाखे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात संदीप ठाकरे, नरेंद्र कातडे, राजू तेलहांडे, गणेश मुटे, कैलास घोडे, सचिन ठवरी, लक्ष्मीकांत सेनाड, सविता घोडे, प्रा. महेश माकडे, भारत पाटील, पंकज साबळे, पुंडलिक हुडे, राजू नगराळे, नितीन सेलकर, रोहित हरणे, गणेश बोरकर, पंकज पुसदेकर, विजय धोटे, शुभम तुळणकर, विजय किलनाके, दीपक मुजबैले, अजय मुळे, नरेंद्र हरणे, वामनराव चौधरी, आशीष धोटे, निखिल किलनाके, रमेश तेलहांडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.
९ आॅगस्टला नागपूर येथे होणाऱ्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानासमोर होणाºया आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने मधुसूदन हरणे, विद्या गिरी, प्रा. महेश माकडे यांनी केले.

Web Title: Vidarbha State Movement Committee made electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.