विदर्भ राज्य आंदोलन समिती निवडणूक लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:44 AM2019-01-10T00:44:57+5:302019-01-10T00:46:58+5:30

सन २०१९ च्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र्य विदर्भ राज्य द्या, अन्यथा चालते व्हा, यासाठी विदर्भभर २ ते १२ जानेवारी या कालावधीत विदर्भ राज्य निर्माण यात्रा काढण्यात येत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती निवडणूक लढविणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी बुधवारी आर्वी येथे पत्रकार परिषदेत दिली.

Vidarbha State Movement Committee will contest the election | विदर्भ राज्य आंदोलन समिती निवडणूक लढविणार

विदर्भ राज्य आंदोलन समिती निवडणूक लढविणार

Next
ठळक मुद्देवामनराव चटप : ‘विदर्भ राज्य द्या, नाहीतर चालते व्हा’चा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सन २०१९ च्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र्य विदर्भ राज्य द्या, अन्यथा चालते व्हा, यासाठी विदर्भभर २ ते १२ जानेवारी या कालावधीत विदर्भ राज्य निर्माण यात्रा काढण्यात येत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती निवडणूक लढविणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी बुधवारी आर्वी येथे पत्रकार परिषदेत दिली.
चटप पुढे म्हणाले, सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने विदर्भ राज्य देण्याचे स्पष्ट आश्वान दिले होते. केंद्रात भाजपाची सत्ता आल्यावर विदर्भ राज्य निर्माण करू असे त्यावेळी सांगितल्या जात होते. विदर्भातून ४४ आमदार भाजपाचे निवडून आले आहे. महाराष्ट्रात त्यांचे सरकार आहे. मात्र, भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचा मुद्दा गुंडाळून ठेवला आहे. ही वैदर्भीय जनतेशी बेईमानी आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा विदर्भ राज्य आमच्या अजेंड्यावर नाही, असे सांगत आहे. त्यामुळे आता भाजपाला जाब विचारण्यासाठी २ ते १२ जानेवारी या कालावधीत विदर्भ राज्य निर्माण यात्रा काढण्यात आली आहे. विदर्भातून चालते व्हा, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर येथून या यात्रेचा प्रारंभ झाला असून सहा जिल्हे फिरून ही यात्रा १२ जानेवारीला नागपूर येथे पोहोचेल. येथे यात्रेचा समारोप जाहीर सभेने होईल. विदर्भात सर्व विदर्भवादी पक्ष व संघटना एकत्रित आल्या असून विदर्भ निर्माण मंचाची स्थापना करण्यात आल्याचेही याप्रसंगी त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक अ‍ॅड. राम नेवले, माजी आमदार सरोज काशीकर, रंजना आमडे, शैला देशपांडे, अ‍ॅड. दिलीप काळे, माजी नगराध्यक्ष वसंत गुल्हाणे, सुधीर देशमुख, धीरेंद्र शेट्ये, दिलीप भोयर, घनश्याम पुरोहित, धोंडबा गावंडे, मुकुंद, रवींद्र आगरकर, मिलिंद देशपांडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Vidarbha State Movement Committee will contest the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.