नागपूर विधान भवनावर लावणार विदर्भाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:52 PM2018-04-27T23:52:16+5:302018-04-27T23:52:16+5:30

वेगळ्या विदर्भाचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यामध्ये पोचले असून महाराष्ट्र दिनी नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून करण्यात येत आहे. त्याची तयारी सुरू झाली असून या संदर्भात विदर्भभर जिल्हा बैठकांचा दौरा सुरू आहे.

 Vidarbha's flag to be imposed on Nagpur Legislative Assembly | नागपूर विधान भवनावर लावणार विदर्भाचा झेंडा

नागपूर विधान भवनावर लावणार विदर्भाचा झेंडा

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र दिनी कार्यक्रम : विदर्भ राज्य आंदोलन समितीची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा /हिंगणघाट : वेगळ्या विदर्भाचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यामध्ये पोचले असून महाराष्ट्र दिनी नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून करण्यात येत आहे. त्याची तयारी सुरू झाली असून या संदर्भात विदर्भभर जिल्हा बैठकांचा दौरा सुरू आहे.
२०१९ च्या निवडणुकीच्या अगोदर भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन संपूर्ण कर्ज मुक्ती व उत्पादन खर्च व ५० टक्के ऐवढा हमी भाव देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, आदी आश्वासन त्वरीत पूर्ण करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
वेगळ्या विदर्भाचे आश्वासन व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच विदर्भातून भाजपाचे ४४ आमदार निवडून आले व त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपाची सत्ता बसली. महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यामध्ये विदर्भाच्या जनतेने भाजपाला प्रचंड साथ दिली; परंतु भाजपाच्या नेत्यांनी मात्र विदर्भाच्या जनतेला दिलेले विदर्भ राज्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे विदर्भातील जनता भाजपापासून नाराज झाली असून निवडणुकीत भाजपाच्या मतपेटीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.
शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहे. भाजपा सरकार शेतकऱ्यांना मरण्यासाठी सरणावर सोडत आहे. भाजपाने निवडणुकीच्या काळात आश्वासन दिले होते. त्यापैकी एकही आश्वासन पाळले नाही. त्यामुळे विदर्भवादी, शेतकरी, बेरोजगार, व्यापारी सर्वच क्षेत्रातून नाराजीच्या सूर निघत आहे. भाजपाने निवडणुकी अगोदर स्वतंत्र विदर्भाची घोषणा करून विदर्भ राज्याची निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा विदर्भातील जनता भाजपाला फटका दिल्या शिवाय राहणार नाही.
महाराष्ट्रदिनी यशवंत स्टेडीयम नागपूर येथून दुपारी विदर्भ मार्च निघेल व १ वाजेपर्यंत हा मार्च विधान भवनावर धडक देणार आहे. तेथे विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन होईल. विदर्भातील जनतेने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे. २५ एप्रिलला विदर्भ राज्य आंदोलन समितीची हिंगणघाट तालुका कार्यकर्ता बैठक एपीएमसी हॉलमध्ये पार पडली. त्यांनतर वर्धेतही बैठक झाली. येथे महाराष्ट्र दिनी नागपूर विधान भवनावर झेंडा लावण्याचे ठरले. या बैठकीत मधु हरणे, रमेश पाटील, संजय चौधरी, पुंडलीक, अभिजीत लाखे, साहेबराव येडे, गणेशपुरे, कैलास घोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
रोजगाराचे आश्वासनही खोटेच
२ कोटी लोकांना वर्षाला रोजगार देणार म्हणजे ४ वर्षात ८ कोटी लोकांना तर रोजगार मिळालाच नाही उलट नोटबंदी व जीएसटी नंतर उद्योग व व्यापारामध्ये अवकळा आली. ३ लाखांपेक्षा जास्त लहान उद्योग बंद झाले. शहरी तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.

Web Title:  Vidarbha's flag to be imposed on Nagpur Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.