पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामस्थांचा मोर्चा

By admin | Published: January 7, 2017 12:55 AM2017-01-07T00:55:37+5:302017-01-07T00:55:37+5:30

येथील नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प करण्यात आला आहे. नळयोजनेचे देयक न भरल्यामुळे वीजपुरवठा बंद केला

Village front for drinking water | पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामस्थांचा मोर्चा

पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामस्थांचा मोर्चा

Next

पिंपळखुटा येथील पाणीपुरवठा ठप्प : कृत्रिम पाणीटंचाईचा करावा लागतो सामना
पिंपळखुटा : येथील नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प करण्यात आला आहे. नळयोजनेचे देयक न भरल्यामुळे वीजपुरवठा बंद केला असून नळयोजना ठप्प झाली आहे. याचा फटका येथील ग्रामस्थांना बसत आहे. हिवाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा विरोध करण्याकरिता येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात गावातील ३०० स्त्रीया व पुरुषांचा सहभाग होता.
येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी, हातपंप याचा आसरा घ्यावा लागतो. पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ग्रामवासियांवर हे संकट निर्माण झाले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेऊन गावातील समस्यांचे निवेदन देण्यात आले. कार्यालयात मोर्चा पोहचला तरी तिथे सरपंच, उपसरपंच, सचिव तसेच कर्मचारी पोहचले नाही. सकाळी १० वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत ग्ग्रामस्थांनी प्रतीक्षा केली. अखेर ग्रामपंचायत कार्यालयासमोरच गावातील समस्या व गावकऱ्यांच्या मागण्या मोर्चासमोरच कथन करुन या समस्यांचे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, माजी आमदार यांना स्वाक्षरीसह देण्यात आले.
गावातील नळयोजना वीज देयक न भरल्यामुळे बंद आहे. यातच मोटरपंप जळाल्यामुळे जलकुंभ पूर्णपणे भरत नाही. परिणामी येथील महिलांना सकाळपासून हातपंपावरुन पाणी भरावे लागते. घरगुती नळजोडणीवर बसविलेल्या मिटरमध्ये २ लाख ७० हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. संबंधितावर कारवाई करुन रकमेची वसुली करुन ती ग्रामपंचायत खात्यात जमा करावी. तसेच देयकाचा भरणा करावा, अशी मागणी निवेदनातून केली. दोन वर्षापासून रोजगार हमीची कामे पूर्णपणे बंद आहे. ही कामे त्वरीत सुरू करण्यात यावी. गावातील पथदिवे दोन महिन्यांपासून बंद आहे. ते सुरू करण्यात यावे. ग्रामसेवकाने कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. गावातील तुंबलेल्या नाल्या वेळोवेळी साफ करण्यात याव्या. ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ वाढलेले गवत साफ करावे. पाण्याच्या टाकीची साफसफाई करावी यासह विविध मागण्यांकरिता पिंपळखुटा वासियांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व शंकर राठी, सुधाकर एडाखे, सतीश चवरे, अरविंद एडाखे, हरीदास काळपांडे, राजेश्वर देवगडे, दिपक पांडे, मारोती इंगळे आदींनी केले.(वार्ताहर)

Web Title: Village front for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.