गावाला वरदान ठरलेला तलाव प्रशासनाकडून दुर्लक्षित

By admin | Published: May 26, 2017 12:54 AM2017-05-26T00:54:44+5:302017-05-26T00:54:44+5:30

पाच एकर झुडपी जागेवर १९५५ ते १९६१ दरम्यान तत्कालीन सरपंच स्व. मारोतराव झाडे व स्व. रामचंद्र बारस्कर यांनी तलावाची निर्मिती केली होती.

The village is ignored by the boon administration | गावाला वरदान ठरलेला तलाव प्रशासनाकडून दुर्लक्षित

गावाला वरदान ठरलेला तलाव प्रशासनाकडून दुर्लक्षित

Next

बेशरमच्या झुडपांचे साम्राज्य : गाळाने बुजल्याने साठवण क्षमता घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : पाच एकर झुडपी जागेवर १९५५ ते १९६१ दरम्यान तत्कालीन सरपंच स्व. मारोतराव झाडे व स्व. रामचंद्र बारस्कर यांनी तलावाची निर्मिती केली होती. या तलावाला गावाच्या बाहेरून येणारा लहान नाला जोडला असल्याने वाहून जाणारे पावसाचे पाणी तलावात साठत होते; पण काही वर्षांपासून या तलावाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी, बेशरमच्या झुडपांचे साम्राज्य असून तलाव गाळाने बुजला आहे. याकडे लक्ष देत गाळ साफ करून तलावाचे खोलीकरण करणे गरजेचे आहे.
सध्या सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या दोन स्वर्गीय नेत्यांनी जमिनीत पाणी मुरावे म्हणून या तलावाची निर्मिती केली होती. काही वर्षांपूर्वी बाहेर गावाहून बाजाराला येणारी मंडळी आपल्या बैल व गुरांना या तलावात पाणी पाजत होते. आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलाव कोरडा पडला आहे. १९८५ ते ९० या काळात असलेले सरपंच रमेश भोयर यांनी या तलावाचे गाळ काढून खोलीकरण केले होते. तलावाच्या मोकळ्या जागेवर झाडे लावण्यात आली होती; पण स्थानिक नागरिकांनी ती झाडे उपडून अतिक्रमण केले आणि जमीन वाहितीत आणली. या बाबीकडे ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी मतदानावर लक्ष ठेवून दुर्लक्ष केले. उलट अतिक्रमणकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. १९५५ ते २००५ पर्यंत या तलावात मत्स्यबीज टाकून मासोळ्या निर्मिती करून याचे कंत्राट दिले जात होते. यातून ग्रामपंचायतीने ५० ते ५५ वर्षांपर्यंत महसुली उत्पन्न घेतले; पण तलावात कुठल्याही सुधारणा केल्या नाही. यामुळेच तलावाची दयनिय अवस्था झाली आहे.
सध्या हा तलाव नगर पंचायतच्या अधिनस्त आहे. स्थानिक पदाधिकारी या तलावाच्या सौदर्यीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे. २०१२-१३ मध्ये ग्रा.पं. अस्तित्वात असताना तलावाच्या सौदर्यीकरणाकरिता शासनाकडून निधी मिळाला होता; पण ग्रा.पं. प्रशासनाने या बाबींवर पैसा खर्च न केल्योन तो शासनाला परत करण्यात आला. सध्या नगर पंचायतीवर आ. कुणावार यांच्या गटाची सत्ता आहे. यामुळे आमदारांनी लक्ष देत या तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकण करीत पाणीटंचाईचा प्रश्न कायम मिटवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

तलाव कोरडा पडल्याने पाणीटंचाईचा प्रश्नही बिकट
शहरातील पाणीटंचाई दूर व्हावी, जमिनीत पाणी मुरावे, उन्हाळ्यातही गोपालकांना गुरांना पाणी पाजण्याकरिता भटकावे लागू नये म्हणून १९५५ मध्ये तलावाची निर्मिती करण्यात आली; पण सध्या दुर्लक्षामुळे तलाव कोरडा पडला आहे. तलावाच्या सभोवताल शहरातील नागरिक प्रात:विधी उरकतात. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य असून दुर्गंधी पसरली आहे. तलाव व जलपर्णी आणि बेशरम मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.

Web Title: The village is ignored by the boon administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.