आठ दिवसांपासून गावाचा पाणी पुरवठा बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:48 PM2017-12-02T23:48:41+5:302017-12-02T23:49:28+5:30

आमगाव (खडकी) येथे वर्धा-नागपूर महामार्गावर सामाजिक वनीकरणजवळील नाल्यात अज्ञात टँकरमधील रसायन सोडल्याने पाणी दूषित झाले होते. यामुळे असंख्य सांप आणि मासोळ्या मृत्युमुखी पडले होते.

The village water supply will not be stopped for eight days | आठ दिवसांपासून गावाचा पाणी पुरवठा बंदच

आठ दिवसांपासून गावाचा पाणी पुरवठा बंदच

Next
ठळक मुद्देआमगाव (खडकी) येथील रसायनयुक्त पाणी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : आमगाव (खडकी) येथे वर्धा-नागपूर महामार्गावर सामाजिक वनीकरणजवळील नाल्यात अज्ञात टँकरमधील रसायन सोडल्याने पाणी दूषित झाले होते. यामुळे असंख्य सांप आणि मासोळ्या मृत्युमुखी पडले होते. याची सूचना तहसीलदारांना देताच त्यांनी गावाला भेट देत ग्रा.पं.च्या पाणीपुरवठा करणाºया विहिरी व हातपंपाचे पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा अहवाल येईस्तोवर पाणीपुरवठा बंद ठेवण्यास सांगितले. आता आठ दिवस लोटूनही गावातील पाणीपुरवठा ठप्पच आहे.
पाण्याचे नमून पाठवून आठ दिवस लोटलेत; पण अद्यापही प्रयोगशाळेकडून पाण्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. परिणामी, ग्रामस्थांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. गावात दोन टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे; पण टँकरचे पाणी अपूरे पडत असल्याने पाण्यासाठी दाही दिशा, अशी अवस्था झाली आहे.
या घटनेनंतर सलग पाच दिवस सेलूचे तहसीलदार सोनवणे, ठाणेदार ब्राह्मणे, पं.स. गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, जि.प. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, आरोग्य विभागाचे बुंदेले, विस्तार अधिकारी पं.स. सेलू, जि.प. सदस्य विनोद लाखे, जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, महिला व बालविकास सभापती सुनीता कलोडे, पं.स. सभापती जयश्री खोडे सेलू, आरोग्य विभागाचे अधिकारी आदींनी आमगाव येथे भेट दिली. या पदाधिकाºयांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देखील देण्यात आली. अद्यापही प्रयोगशाळेकडून पाणी तपासणीचा अहवाल प्राप्त न झाल्याने ग्रा.पं. पाणीपुरवठा आठ दिवसांपासून बंदच आहे. ग्रामस्थांना दोन टँकरच्या माध्यमातून तात्पूरता पाणीपुरवठा केला जात असला तरी त्याने तहाण भागत नसल्याच्या प्रतिक्रीया नागरिक व्यक्त करीत आहेत. शिवाय पशु पालकांसमोर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. यामुळे सध्या आमगाव येथील नागरिकांचे लक्ष पाणी अहवालाकडे लागले आहे. आणखी किती दिवस पाणी पुरवठा बंद राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकाºयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

Web Title: The village water supply will not be stopped for eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी