युवकाच्या शस्त्रक्रियेसाठी गावकरी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:40 PM2018-08-11T23:40:27+5:302018-08-11T23:41:05+5:30

येथील सुरज महेंद्र नगराळे(२३) याच्या पोटातील आतड्यामध्ये गँगरींग झाल्याचे निदान सावंगी रुग्णालयात करण्यात आले व ताबडतोब नागपूरला हलवून शस्त्रक्रिया करण्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी ्अवघ्या ६ तासात दीड लाख रूपये गोळा करण्यात आले.

The villagers have come to the rescue of the youth | युवकाच्या शस्त्रक्रियेसाठी गावकरी सरसावले

युवकाच्या शस्त्रक्रियेसाठी गावकरी सरसावले

Next
ठळक मुद्दे६ तासात दीड लाख रूपये झाले जमा

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : येथील सुरज महेंद्र नगराळे(२३) याच्या पोटातील आतड्यामध्ये गँगरींग झाल्याचे निदान सावंगी रुग्णालयात करण्यात आले व ताबडतोब नागपूरला हलवून शस्त्रक्रिया करण्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी ्अवघ्या ६ तासात दीड लाख रूपये गोळा करण्यात आले.
सेवाग्राम येथून नागपूरला खासगी रूग्णालयात हलविल्यानंतर तिथेही ताबडतोब शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सुरुवातीला ३ लाख व पुढील उपचारासाठी सात लाख असा अंदाजे १० लाखाचा खर्च सांगितला. वडिल ड्रायव्हर व आई शिवणकाम, बचत गटाची काम करणारी. कुठून आणणार एवढा पैसा, शस्त्रक्रिया झाली नाही तर सुरजचे प्राण वाचणे कठीण. ही वार्ता सुरजच्या मित्र परिवाराला कळली त्यांनी लगेच ही माहिती स्थानिक व्हॉटस अ‍ॅप ग्रुपवर टाकली आणि बघता बघता गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. मित्र परिवार सुरजच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करायला पुढे आला व अवघ्या ५-६ तासात दिड-दोन लाखाची मदत जमा झाली. ही मदत जमा करण्यासाठी नितीन कवाडे, राहुल खोब्रागडे, अमोल उमाटे, अमोल शेंडे यांनी पुढाकार घेतला. नागरिकांनीही विश्वासाने त्यांना रक्कम दिली. जमा झालेली रक्कम आई-वडिलांचे स्वाधीन केल्यानंतर लगेच त्याची शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली. सुरजच्या पोटातील आतड्यामध्ये गँगरिन आधुनिक शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याचेवर पुढील दोन महिने उपचार सुरू राहणार आहे. शेतकरी,शेतमजुर, व्यावसायिक भागवत सेवा समिती, महिला बचत गट, आॅटोचालक सामाजिक संघटना असे अनेक जण सुरजच्या मदतीला धावून आले.

Web Title: The villagers have come to the rescue of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य