पळसगाव (बाई) मध्ये गावबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:12+5:30
मागील महिन्यात गुडी पाडव्याच्या दरम्यान असणारी संत सखुआईची यात्रा कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रद्द करण्यात आली. या गावात एकोपा असून सध्या धडाडीचा निर्णयच सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने घेतला आहे. इतकेच नव्हे तर केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन या गावात सध्या केले जात आहे. गावबंदीचा निर्णय सरपंच धीरज लेंडे, ग्रा.पं. सदस्य तसेच विविध समितींच्या सदस्यांच्या नेतृत्त्वात घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : नजीकच्या ३ किमी अंतरावरील पळसगाव (बाई) हे गाव संत सखुआईच्या वास्तव्याने विदर्भात प्रसिद्ध आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी जगात या विषाणूने थैमान घातले आहे. सुरक्षीत गावासाठी या गावातील नागरिकांनी गावबंदीचा निर्णय घेतला आहे. शिवाय गावात येणाऱ्यांना गावाच्या प्रमुख मार्गावर अडवून अधिकची माहिती दिली जात आहे.
मागील महिन्यात गुडी पाडव्याच्या दरम्यान असणारी संत सखुआईची यात्रा कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रद्द करण्यात आली. या गावात एकोपा असून सध्या धडाडीचा निर्णयच सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने घेतला आहे. इतकेच नव्हे तर केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन या गावात सध्या केले जात आहे. गावबंदीचा निर्णय सरपंच धीरज लेंडे, ग्रा.पं. सदस्य तसेच विविध समितींच्या सदस्यांच्या नेतृत्त्वात घेण्यात आला आहे. गावाच्या मुख्य प्रवेश मार्गावर चौकी तयार करण्यात आली आहे. संचारबंदीचा भंग न होऊ देता एकूण ३० स्वयंसेवक आळीपाळीने येथे सेवा देत आहेत. अतिशय आवश्यक कारणाशिवाय कुणालाही गावात जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच गावात जाणाºयाला सेनेटाईज करून गावात सोडले जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना या गावातील नागरिकांना दवंडीच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. शिवाय गाव निर्जंतूक केले जात आहे. तर इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आरोग्य केंद्रातील डॉ. अमोल शेळके, शशिकांत अडसड, सपना तळवेकर हे दररोज त्यांची तपासणी करीत आहेत. बाहेर गावातील मजुरांना अन्नधान्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. या गावबंदी व इतर समस्यावर गावाचे सरपंच धीरज लेंडे, उपसरपंच बोरकुटे, पोलीस पाटील रत्नाकर देवतळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष कैलास बोरकर, ग्रा.पं. सदस्य दिलीप घुंगरे, कुबडे, वाणी, धाबडधुस्के इतर सदस्य लक्ष ठेवून गावात जनजागृती करीत आहे. तसेच स्वयंसेवक म्हणून अमोल पांडव, पुरुषोत्तम नासरे, राकेश पांडव, वैभव पेटकर, नितेश द्रुगवार, अमित रेवतकर, रुपेश लाखे, अरुण बारइ, प्रकाश रेवतकर, समीर कुबडे, शंकर झंझाडे, रिकी वाघमारे, हर्षद गोलहर, आदित्य बोरकर, गणेश दुर्गवार, आशिष सातघरे, साजीत शेख व इतर गावातील तरुण मंडळी जबाबदारी पार पाडत आहेत.